महाराष्ट्र
सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकाराने वृध्द महिलेवर अंत्यसंस्कार; मुलीने केला आईचा दहनविधी
करमाळा प्रतिनिधी:अंगद भांडवलकर
कोरोना संसर्गाच्या या भयावह काळात स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला देखील नातलग जात नसल्याचे वृत्त आपण वाचतो, पाहतो आहे. मात्र केतूर (ता. करमाळा) येथील सामाजिक कार्यकर्ते ॲड. अजित विघ्ने यांनी पुढाकार घेऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, केत्तूर (ता.करमाळा) येथील वयोवृद्ध महिला केशरबाई जयसिंग रणसिंग (वय ६९ ) या बऱ्याच दिवसापासून एकटयाच राहत होत्या. वृद्धापकाळ व हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे रविवारी पहाटे निधन झाले. कोरोनाच्या भीतीमुळे त्यांच्याकडे पाहण्यास कोणीही गेले नाही. ही बातमी येथील सामाजिक कार्यकर्ते माजी उपसरपंच अँड.अजित विघ्ने यांना समजताच त्यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांच्या बारामती येथे राहणाऱ्या एकुलत्या एका मुलीस (राजश्री ढवाण पाटील) मोबाईलवर संपर्क साधून ही बातमी दिली. हे समजताच बारामती वरून मुलगीही केतूर येथे आली व तिनेच स्वतः आईच्या अंत्यविधीचा सर्व कार्यक्रम पार पाडला व अल्प लोकांच्या उपस्थितीत उजनी तीरावरील स्मशानभुमीत आईचा मृतदेहास भडाग्नीही दिला.
यावेळी विघ्ने यांचेबरोबर सहकारी महादेव नगरे, तानाजी गुंजाळ, संदिप काटवटे, ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण खैरे, अशोक साळवे, महादेव गुंजाळ, आकाश नगरे, रवींद्र विघ्ने, सलीम शेख, जोत्सना निसळ, कीर्ती पानसरे यांनीही सामाजिक बांधिलकी जपत सहकार्य केले.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा