कोरोना
राष्ट्रीय
गुजरात , महाराष्ट्र कोरोनावर यशस्वी मात करतील : पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांना कोरोनाविरोधातील लढ्यात यश मिळूदे अशी प्रार्थना केली.
एक मे हा दिवस महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांचा स्थापना दिवस आहे. महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महाराष्ट्र दिन साधेपणाने साजरा केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन्ही राज्यांना स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी त्यांनी दोन्ही राज्यांना कोरोनाविरोधातील लढ्यात यश मिळूदे अशी प्रार्थना केली. देशात कोरोनाने थैमान घातलं असून शुक्रवारी दिवसभरात 4 लाख नवीन रुग्ण सापडले आहेत. तर मृत्यूचा आकडाही साडेतीन हजारांहून अधिक आहे.
मोदींनी ट्विटवरवरून शुभेच्छा देताना म्हटलं की, आज गुजरात आणि महाराष्ट्राचा स्थापना दिवस. दोन्ही राज्ये ही देशाच्या विकासात ऐतिहासिक योगदान देणाऱ्या महापुरुषांची मातृभूमी आहेत. मी प्रार्थना करतो की दोन्ही राज्ये कोरोनाविरोधातील लढा जिंकू दे आणि तिथले लोक निरोगी रहावेत.
गेल्या 24 तासांत देशात चार लाख एक हजार 993 नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात तीन हजार 523 जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्र, पंजाब, दिल्ली, गुजरातसह देशातील प्रमुख राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं पसरत आहे.
भारतात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. शुक्रवारी दिवसभरात राज्यात 62 हजार 919 नवीन रुग्ण सापडले. तर 828 कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोदं झाली. दिवसभरात 69 हजार 710 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात 6 लाख 62 हजार 640 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
गुजरातमध्येही कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. शुक्रवारी राज्यात 14 हजार 327 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत गुजरातमध्ये 5 लाख 53 हजार 172 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या 24 तासात 180 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेली ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा