श्रीगुरुजी प्रतिष्ठान व अभाविप च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महादेव फंड, कुणाल येवले यांनी केले प्लाझ्मा दान - दैनिक शिवस्वराज्य

श्रीगुरुजी प्रतिष्ठान व अभाविप च्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद; महादेव फंड, कुणाल येवले यांनी केले प्लाझ्मा दान



करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
           कोरोना च्या दुसऱ्या लाटेत अनेक जण बळी पडत आहेत. मानवावर आलेले संकट भयानक आहेच शिवाय याचा सामना करत असताना अनेक जणांना अडचणी निर्माण होत आहेत. नातेवाईकांची धावपळ होत आहे. या कठीण काळात  श्रीगुरुजी प्रतिष्ठान व अखिल भारतीय विद्यार्थी परिषद करमाळा अनेक प्रकारचे सेवाकार्य करत आहेत. यामध्ये रुग्णांना औषधे, बेड उपलब्ध करून देणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे, प्लाझ्मा उपलब्ध करून देणे, रुग्ण व नातेवाईक यांना जेवणाचे डबे उपलब्ध करून देणे, रक्तदान आणि प्लाझ्मा दान, लस घेणे यासाठी जनजागृती करणे, असे विविध मदतीचे सेवाकार्य चालू आहे.
सध्या रेमेडीसिवर इंजेक्शन चा तुटवडा जाणवतो आहे.अनेक ठिकाणी यावर उपाय म्हणून प्लाझ्मा थेरेपी देखील दिली जात आहे. श्री गुरुजी प्रतिष्ठान आणि अभाविप यांच्यामार्फत रुग्णाला नवसंजीवनी देणारा हा प्लाजमा तात्काळ रुग्णाला मिळावा यासाठी  प्लाजमा हेल्पलाईन, करमाळा म्हणून नव्याने वेबसाईट चालू केली आहे. यामध्ये कोरोना आजारातून बरे होऊन एक महिना झाले आहेत अशांनी नोंदणी करावी अशी विनंती करमाळा तालुक्यातील जनतेला केली आहे. या विनंती ला सहकार्य करत करमाळा येथील नगरसेवक महादेव अण्णा फंड आणि कुणाल उदय येवले या दोघांनी देि.०४ मे रोजी बार्शी येथे जाऊन आपला प्लाझ्मा दिला असुन दान केलेला हा प्लाजमा करमाळा येथील  पवार हॉस्पिटल मधील दोन रुग्णांना दिला आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे. या कार्याबद्दल महादेव अण्णा फंड आणि कुणाल येवले यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. तर या दोन प्लाझ्मा दुतांचा सत्कार रा. स्व. संघाचे संघचालक मा.डॉ. श्रीराम परदेशी यांनी केला आहे. यावेळी श्री गुरुजी प्रतिष्ठान आणि अभाविप कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यासाठी दहा संघ स्वयंसेवक कार्यकर्ते यांची टीम कार्य करत आहे असून आपणही या संकट काळात गरज पडल्यास प्लाझ्मा दान करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. आपल्या या प्लाझ्मा दानातून दोन रुग्णांचे प्राण वाचतील. प्लाझ्मा दान केल्याने कोणताही त्रास होत नाही संपूर्ण टेस्ट करूनच व्यक्तीच्या शरीरातून प्लाज्मा काढला जातो त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही असे महादेव अण्णा फंड यांनी सांगितले. तर आपल्यामुळे दुसऱ्या कोणाचा तरी जीव वाचतोय यासारखे दुसरे समाधान नाही असे येवले यांनी सांगितले.

प्लाझ्मा दान नोंदणी करण्यासाठी लिंक:-

नोंदणी संपर्क:- 9156477195 , 7722006795.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads