महाराष्ट्र
वडगांव येथील युवकांचा स्तुत्य उपक्रम; राजमुद्रा ग्रुप तर्फे 'या' दिवशी होणार मास्कचे वाटप
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर
कोरोना या रोगाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेता नागरीकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेता वडगांव येथील युवकांनी राजमुद्रा ग्रुप मार्फत आणि माझे गावं माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत गावातील यात्रेनिमित्त दि.०७/०५/२०२१ रोजी घरोघरी जाऊन मास्कचे वाटप करण्यात येणार आहे.
वडगांव ग्रामपंचायतीमार्फत व वेगवेगळ्या समाजसेवी मंडळामार्फत कोरोना काळात घ्यावयाची खबरदारी बाबत वेळोवेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जाते. या समाजकार्यात प्रामुख्याने राजमुद्रा ग्रुप, दक्षिण वडगांव मार्फत विविध उपक्रम घेण्यात आले आहेत. नागरिकांनी बाहेर जाताना कोरोना चा संसर्ग होऊ नये म्हणून मास्क वापरणे गरजेचे आहे.
गावांतील गोरगरीब गांवकऱ्यांची गरज ओळखुन राजमुद्रा ग्रुपच्या सर्व सदस्यांनी गावांत मोफत मास्क वितरनाचा निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरुन नेहमीच सामाजिक कामात अग्रेसर असणारे गावातील इंजीनियर कल्याण वाडेकर व सीए लहुसाहेब काळे यांनी राजमुद्रा ग्रुपला भरीव अर्थसहाय्य करीत ग्रुपमार्फत १५० मास्क खरेदी करून मोफत वाटण्यात येणार आहेत. ग्रामस्थ एकत्र आल्यावर होणारा संसर्ग टाळण्यासाठी व सध्या जमावबंदी आदेश लागू असल्यामुळे सदर मास्कचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात येणार असल्याची माहिती राजमुद्रा ग्रुप कडून देण्यात आली आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा