महाराष्ट्र
करमाळा शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्षपदी मयुर यादव तर कार्याध्यक्षपदी संजय शीलवंत
करमाळा प्रतिनिधी: अंगद भांडवलकर
शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी मयुर यादव तर कार्याध्यक्षपदी संजय शीलवंत यांची निवड करण्यात आली आहे तर समन्वयक म्हणून शंभूराजे फरतडे काम पाहणार आहेत. कार्यकारणी पुढील प्रमाणे...सल्लागार व मार्गदर्शक म्हणून माजी आमदार नारायण आबा पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर, उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, भरत अवताडे, पंचायत समिती सभापती गहिनीनाथ ननवरे, ॲड. अजित विघ्ने, डॉ. अमोल घाडगे, पृथ्वीराज भैय्या पाटील, जिल्हा परिषद सदस्य बिभीषन आवटे, प्रा. शिवाजीराव बंडगर काम पाहणार आहेत.
कार्यकारणी सदस्य म्हणून विशाल गायकवाड, पत्रकार नागेश चेंडगे, दादा तनपुरे, अविनाश भिसे, संतोष गानबोटे, पंकज परदेशी, उमेश पवार, संजय भालेराव, करण काळे, हनुमंत रंधवे, सागर कोकाटे, चक्रधर पाडळी, अशोक रंधवे फिसरे, ग्रा.स. हनुमंत रोकडे काम पाहणार आहेत.
रुग्णांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड उपलब्ध करून देणे, शासकीय कोट्यातून रेमेडेसिविर औषध उपलब्ध करून देणे, कोरोना चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गावागावात प्रभागा प्रभागात उपाय योजना राबवणे, प्रमाणापेक्षा रुग्णालयाची जास्त झालेले बिल कमी करून घेणे, अधिकृत पक्की बिले न देणाऱ्या मेडिकल दुकानदारा बद्दल तक्रार करणे, रक्त तपासणी केंद्रातून सुरू असलेली लूट थांबवणे, ऑक्सिजन बँकेमार्फत ऑक्सिजन उपलब्ध करून देणे, शासकीय आरोग्य अधिकारी अधिकृत पोरं हॉस्पिटल यांच्याशी समन्वय ठेवून जास्तीत जास्त रुग्णांना सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे, रुग्णांना कोरोना ग्रस्तांना हवी ती मदत उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न ही कामे या समितीमार्फत करण्यात येणार आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्यामार्फत करमाळा तालुक्यासाठी एक सुसज्ज रुग्णवाहिका व पाच ऑक्सिजन कॉन्ट्रॅक्टर मशीन्स दिल्या आहेत. तसेच शेकडो रुग्णांना खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून मोफत इंजेक्शन दिले आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या आभाराचा ठराव या बैठकीत घेण्यात आला.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा