चक्रीवादळामुळे 'या' ४ जिल्ह्यात पडणार मुसळधार पाऊस
तौत्के चक्रीवादळाचा परिणाम संपुर्ण महाराष्ट्राला जाणवायला सुरूवात झाली आहे. तौत्के चक्रीवादळाचा तळ गोव्याकडून कोकण किनारपट्टीवर आहे. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं आहे. अनेक झाडांची पडझड झालेली पाहायला मिळत आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा सुद्धा खंडित झाला आहे.
उद्याही या चक्रीवादळाचा फटका बसणार असल्याचं अंदाज वर्तवला आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी उद्या ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. या जिल्ह्यांत उद्या अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
नागरिकांनी घरातून बाहेर पडण्याचे टाळावे, मुंबईतील चौपाट्या तसेच समुद्रकिनाऱ्या नजीकचा परिसर इत्यादी ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये असं, असं आवाहनही हवामान खात्याने केलं आहे. उद्या मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागने वर्तवली आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्याला या वादळाचा मोठा फटका बसला आहे. सावंतवाडी ते वेंगुर्ला यांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांवर अनेक झाडं चक्रीवादळाने उन्मळून पडली आहेत. इलेक्ट्रिक पोलही अनेक ठिकाणी पडले आहेत. यामुळे अनेक रस्तेही बंद झाले आहेत.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा