महाराष्ट्र
टँकरने पाणी पुरवठा व उद्या मोफत ताडपत्री वाटप
तौक्ती चक्रीवादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या मालवण देवबागच्या मदतीसाठी भाजपचे नेते, माजी खासदार निलेश राणे धावून आले. शुक्रवारी श्री. राणेनी देवबाग मध्ये टँकरने पाणी पुरवठा केला असून शनिवारी देखील याठिकाणी पाणी पुरवठा करण्यात येणार असून येथील घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ग्रामस्थांना मोफत ताडपत्री वाटप केले जाणार आहे.
कोकणात ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्ती ओढवते, त्यावेळी राणे कुटुंबीय मदतीसाठी नेहमीच पुढे असते, याची प्रचिती वारंवार दिसून येते. तौक्ती चक्रीवादळ प्रसंगात देखील हेच समोर आले आहे. मालवण तालुक्यातील देवबाग मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने शुक्रवारी गावात टँकरने पुरवठा करण्यात आला. यावेळी भाई मांजरेकर, मंदार लुडबे, गणेश केळुसकर, संकेत राऊळ, गणेश मोंडकर, नाना तांडेल, दत्ता चोपडेकर, बाबू कासवकर, जिजी कांदळगावकर, पंकज मालंडकर आदी उपस्थित होते. शनिवारी निलेश राणे यांच्या माध्यमातून देवबाग मध्ये मोफत ताडपत्री वाटप करण्यात येणार आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा