मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध ; आंदोलकांना अटक - दैनिक शिवस्वराज्य

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध ; आंदोलकांना अटक


मंत्री विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आलेल्या मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 
  ओरोस रेस्ट हाऊस येथे हे आंदोलन मराठा बांधवांच्या वतीने करण्यात आले. यावेळी गनिमी काव्याने पोहचलेल्या ३० कार्यकर्त्यांना पोलिसांनी तांब्यात घेतले. जिल्हाध्यक्ष अँड सुहास सामंत, दादा साईल यांनी या कार्यकर्त्यांचे नेतृत्व केले. ओबीसी समाजामधे मराठा समाजाचा समावेश नको असे विधान मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्याने त्यांचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटले. या. आंदोलकांवर पोलिसांनी दमदाटी केल्याने मराठा समाजाचे कार्यकर्ते पदाधिकारी अधिकच आक्रमक झाले. यावेळी मराठा समाजातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी विविध घोषणा देत मंत्री विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त केला. त्यावेळी उपस्थित ॲड सुहास सावंत, पणदूर सरपंच दादा साईल, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, रुपेश बिडये, भूषण राणे, दिनेश म्हा डगुत, दिनेश वारंग, केदार राऊळ, वैभव जाधव, प्रथमेश परब, आवळेगाव सरपंच सुनील सावंत, निलेश परब, प्रशांत राणे, सुंदर सावंत, राजवीर पाटील, आशिष कोष्टी, विष्णू धुरी, आधी मराठा आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads