अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॅार्टचा अहवाल मागवणार : राज्यपाल - दैनिक शिवस्वराज्य

अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॅार्टचा अहवाल मागवणार : राज्यपाल



 राज्याचे परिवहन मंत्री श्री. अनिल परब यांच्या दापोली येथील अनधिकृत रिसॉर्ट, सीआरझेडचे भंग, वन व पर्यावरणचे नुकसान, सरकारी दस्तावेजात खाडखोड व मंत्री पदाच्या दुरुपयोग संबंधी मला तक्रार व दस्तावेज मिळाले आहेत. या संबंधी मी राज्याच्या मुख्य सचिवांकडून अहवाल मागवणार असे आश्वासन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया व शिष्टमंडळाला दिले. 
    भाजपा नेते डॉ. किरीट सोमैया यांच्या सह खासदार श्री. गोपाळ शेट्टी, आमदार श्री. राम कदम, आमदार श्री. मिहीर कोटेचा, आमदार श्री. राहुल नार्वेकर, मुंबई महामंत्री श्री. संजय उपाध्याय, श्री. युवराज मोरे आणि श्री. सिद्धार्थ शर्मा ह्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्राच्या राज्यपालांची राजभवन येथे भेट घेऊन श्री. अनिल परब यांचे गैरकायदेशीर बांधकाम, सरकारी देस्तावेजात खाडखोड, अपारदर्शक आर्थिक व्यवहार या संबंधी निवेदन व पुरावे दिले आहेत.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads