महाराष्ट्र
अंशकालीन शिक्षक भरती
रत्नागिरी : शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. त्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पदवीधर डी.एड, बी. एड उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षण सेवकाप्रमाणे काम करणेस संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार जिल्हा परिषदस्तरावर केला जात असल्याचे जि.प. शिक्षण-क्रीडा व वित्त समिती सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सांगितले आहे.
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नोकरी उपलब्ध करुन देण्याबाबत कौशल्य विकास व उदयोजकता विकास विभाग, मंत्रालय, मुंबई व ग्रामविकास विभाग, मुंबई यांचे शासन निर्णय नुसार सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या शाळांमध्ये त्या शैक्षणिक वर्षात संचमान्यतेपेक्षा शिक्षकांची पदे कमी असल्यास अथवा अन्य कारणाने संचमान्यतेच्या संख्येप्रमाणे शिक्षक उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होतात. यामुळे शिक्षक उपलब्ध न झाल्यास जिल्हयामध्ये शिक्षकांची नियमित नियुक्ती होईपर्यंत फक्त त्या शैक्षणिक वर्षासाठी अशा रिक्त पदावर आवश्यकतेनुसार शैक्षणिक अर्हता धारण करीत असलेल्या अंशकालीन उमेदवारांना शिक्षण सेवकांप्रमाणे नियुक्ती देता येणार आहे. अशा उमेदवारांना शिक्षण सेवकांप्रमाणे नियुक्ती देताना जिल्हयातील अंशकालीन उमेदवारांची यादी सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याकडून प्राप्त करुन घेउन नियुक्ती देणेत येते. जे पदवीधारक डी. एड व पदवीधारक बी.एड अंशकालीन पदवीधर आहेत व ज्यांनी सहाय्यक संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये अध्याप नावनोंदणी केलेली नाही. अशा पदवीधर अंशकालीन उमेदवारांनी संचालक, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रामध्ये नाव नोंदणी करावी. जिल्हा परिषद रत्नागिरीमध्ये शिक्षकांची पदे मोठया प्रमाणात रिक्त आहेत. म्हणून जिल्हयातील पदवीधर डी. एड/ बी. एड उमेदवारांना अंशकालीन म्हणून शिक्षण सेवकाप्रमाणे काम करणेस संधी उपलब्ध करुन देण्याचा विचार करत केला जणार असल्याचे सभापती चंद्रकांत मणचेकर यांनी सांगितले आहे.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा