महाराष्ट्र
राजकीय
करमाळा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निवडी जाहीर; 'हे' आहेत नवीन पदाधिकारी
करमाळा प्रतिनिधी:अंगद भांडवलकर
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. जयवंतराव पाटील साहेब, उपमुख्यमंत्री मा.श्री. अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निमंत्रक मा.खा. सुप्रियाताई सुळे आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेशाध्यक्षा कु. सक्षणाताई सलगर यांच्या मान्यतेने व जिल्हाध्यक्षा कु. श्रीया किरण भोसले यांच्या मार्गदर्शनाने करमाळा राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या निवडी जाहीर झाल्या आहेत.
सदर निवडी या कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन जाहीर करण्यात आल्या आहेत. यावेळी करमाळा तालुका अध्यक्षपदी सौ.शितल ज्ञानदेव क्षीरसागर ग्रा.पं. सदस्या,पांडे तसेच करमाळा तालुका कार्याध्यक्षपदी कु.स्नेहल ज्ञानदेव अवचर युवा ग्रा.पं.सदस्या, मांगी यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.
यावेळी निवडीचे पत्र मेलद्वारे पाठवली असून पक्ष बळकटीसाठी तसेच पक्षाची धोरणे आणि देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे विचार सर्व सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचा विश्वास नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
आमच्या सोबत पार्ट-टाइम काम करून Extra इनकम करण्याची संधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Previous article
Next article
ज्ञानदेव या नावाची राशीचा योग चांगला असावा .
उत्तर द्याहटवा