राज्यात 'या' जिल्ह्यात आजपासून कडक लॉकडाऊन
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी (दि.15) मध्यरात्री 12 पासून रविवारी (दि.23) रात्री 12 वाजेपर्यंत कडकडीत लॉकडाऊन केले जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरू आहे. दररोज आढळून येणारी रुग्णसंख्या आणि मृत्यूंमध्ये वाढच सुरू आहे. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात आठ दिवस कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधित सर्व यंत्रणांना जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. यापूर्वी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू जाहीर केला होता.
मात्र, रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. किराणा आणि भाजी खरेदीसाठी दररोज गर्दी वाढत आहे. महापालिकेने अशा गर्दीत केलेल्या अँटिजेन चाचणीत कोरोनाबाधित आढळून आले. यामुळे आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये दूध, भाजी आणि गॅस वितरण घरपोच केले जाणार आहे. नागरिकांसाठी ही सेवा विक्रेत्यांना घरपोच द्यावी लागणार आहे. त्यामुळे औषध दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने बंद राहणार आहेत. या लॉकडाऊनमध्ये गर्दी कमी होईल आणि कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे.
...हे राहणार चालू
दूध, भाजीपाला, गॅस घरपोच वितरण सर्व वैद्यकीय सुविधा औषध दुकाने ऑक्सिजन उत्पादन व पुरवठा उद्योग शेतीशी निगडित कामे व मान्सूनपूर्व कामे पेट्रोल पंप (अत्यावश्यक सेवा) मालवाहतूक व त्यांची कार्यालये कायदा-सुव्यवस्था व अत्यावश्यक सेवेची कार्यालये एटीएम, पोस्ट कार्यालये प्रसारमाध्यमे वृत्तपत्र वितरण इंटरनेट यंत्रणा, दूरध्वनी, मोबाईल सेवा
...हे राहणार बंद
सर्व किराणा दुकाने बँका, उद्योगधंदे, यापूर्वी बंद असलेले सर्व व्यवहार खासगी प्रवासी वाहतूक हॉटेल, रेस्टॉरंट, बार बागा, मैदाने, व्यायामशाळा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खासगी, व्यापारी अस्थापना रिक्षा-टॅक्सी.
आमच्या सोबत पार्ट-टाइम काम करून Extra इनकम करण्याची संधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा