माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना सुप्रीम कोर्टाचा धक्का
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती (Supreme court Judge) बी. आर. गवई (B R Gavai) यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर (ex mumbai police commissione parambir singh) सुनावणी करण्यास नकार दिला आहे. परमबिर सिंह यांच्या विरोधात दाखल प्रकरणाची सीआयडीची चौकशी सुरू करण्यात आली आहे. परमबिर सिंह यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सर्व चौकशी महाराष्ट्राबाहेर (transfer of inquiries outside of Maharashtra) स्थलांतरीत करण्याची किंवा स्वतंत्र एजन्सीद्वारे चौकशी करण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण न्यायमूर्ती विनीत शरण आणि न्यायमूर्ती गवई यांच्या पीठासमोर सुनावणीसाठी आलं होतं.
या प्रकरणाची सुनावणी सुरू होताच न्यायमूर्ती शरण यांनी म्हटलं की, न्यायमूर्ती गवई यांना या प्रकरणी सुनावणी करण्यात काही अडचण आहे. त्यामुळं हे प्रकरण दुसऱ्या पीठाकडे पाठवावं असं आम्ही सांगू इच्छितो. या प्रकरणावर मी सुनावणी करू शकत नाही, असं गवई यांनी म्हटलं आहे. पीठाने म्हटले की, आमचा समावेश नसेल अशा दुसऱ्या एखाद्या पीठाकडे हे प्रकरण वर्ग करावं.
सिंह यांच्या वतीनं कोर्टात उपस्थित झालेल्या वकिलांनी म्हटले की, त्यांच्या अशिलाच्या विरोधात सुरू असलेली चौकशी पूर्णपणे द्वेषाच्या भावनेतून केली जात आहे. यातून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या आदेशांचं उल्लंघन झाल्याचंही वकील म्हणाले आहेत. परमबीर सिंह हे 1988 च्या बॅचचे आयपीएल अधिकारी आहेत. मार्च महिन्यात त्याची मुंबई पोलिसांच्या आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र राज्य होमगार्डचं जनरल कमांडर पद देण्यात आलं होतं. तत्कालीन गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वरीष्ठ नेते अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर त्यांना पदावरून हटवण्यात आलं होतं.
मुंबई उच्च न्यायालयानं देशमुख यांच्या विरोधात सिंह यांनी लावलेल्या आरोपाच्या चौकशीसाठी सीबीआयला मंजुरी दिली होती. त्यानंतर देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणात परमबिर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, राज्यसरकार आणि राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या संस्थांनी त्यांच्या विरोधात अनेक चौकशी सुरू केल्या आहेत. त्या चौकशा महाराष्ट्राबाहेर स्थरांतरीत करण्याची मागणी त्यांनी केली होती. परमबिर सिह यांनी त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या चौकशी द्वेषाच्या भावनेतून असल्याचंही म्हटलं आहे. या याचिकेत राज्य सरकार, सीबीआय आणि महाराष्ट्र पोलिसांना पक्षकार बनवण्यात आलं आहे. मात्र आता न्यायमूर्तींनी या प्रकरणी चौकशीला नकार दिल्यानं हे प्रकरण दुसऱ्या पीठाकडं सोपवल्यानंतर त्यावर सुनावणी होईल.
दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा