महाराष्ट्र
सरकाची वाट न पाहता निलेश राणे यांनी केली आर्थिक मदत; वादळाग्रस्त भागाची निलेश राणे यांनी केली पाहणी
रत्नागिरी जिल्हा प्रतिनिधी : राकेश कोळी
कोकण किनारपट्टीला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसल्यानंतर नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहता माजी खासदार निलेश राणे यांनी नुकसानग्रस्ताना आर्थिक मदत सुपूर्द करून सर्वसामान्यांच्या मनातील सर्वसामान्यांचा नेता ही आपली ओळख पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध ठिकाणी तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झालेले आहे. परिस्थिती हाताळण्यात ठाकरे सरकार पूर्णपणे फेल गेलं आहे. अश्या परिस्थितीमध्ये मागच्या निसर्ग चक्रीवादळासारख ह्या वादळात सुद्धा ठाकरे सरकार कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडत असल्याचे दिसून येत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर केला आहे. ते पुढे म्हणाले की, ठाकरे सरकार आल्यापासून राज्याला पणवती लागली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. या चक्रीवादळामुळे घरांची छपरे उडून गेली आहेत तर गाईंचे गोठे, बागा तसेच विद्युत पोलदेखील पडले आहेत अश्या परिस्थितीत रत्नागिरीचे पालकमंत्री, खासदार, आमदार सर्व सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडलं आहे. कोरोनामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडक लॉकडाऊन आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय बंद आहेत. १ जून नंतर परिस्थिती सामान्य होईल असं वाटतं असताना तौक्ते चक्री वादळामुळे जनजीवन पुन्हा विस्कळीत झाली आहे. अश्या परिस्थितीमध्ये मागच्या निसर्ग चक्रीवादळासारख ह्या वादळात सुद्धा ठाकरे सरकार कोकणातल्या जनतेला वाऱ्यावर सोडणार असं दिसतंय असे राणे यांनी शेवटी सांगितले.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा