अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला अटक - दैनिक शिवस्वराज्य

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला अटक


पुणे प्रतिनिधी-श्री जयसिंग शिंदे,
 
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन यांची पुतणी प्रियदर्शनी निकाळजेला अटक करण्यात आली आहे पन्नास लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी  पुणे खंडनी विरोधी पोलिसांनी ही  कारवाई केली आहे प्रियदर्शनी निकाळजे मागील एक वर्षापासून फरार होती अखेर मंगळवारी 18 मे रोजी पोलिसांनी सापळा रचून तिला बेड्या ठोकल्या, छोटा राज यांची पुतणी प्रियदर्शनी काळजीने मार्च  2020 मध्ये एका व्यक्तीकडून कौटुंबिक भांडणाचा फायदा घेऊन 50 लाख रुपयांची खंडणी मागितली होती तसेच त्या व्यक्तीला मी एका राजकीय पक्षाची  जिल्हाध्यक्ष आहे, "तसेच गेंगस्टार छोटा राज यांची पुतणी असून आमचा डीएनए देखील एकच आहे" स्वतःचा जीव प्रिय असेल तर 50 लाख रुपये दे  अशी तिने त्या व्यक्तीला धमकी दिली होती आणि  खंडणी मागितली होती या प्रकरणी कात्रज मधील व्यवसायिका ने तक्रार दिल्या नंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत, सापळा रचला आणि 25 लाखांची खंडणी स्वीकारताना धीरज साबळे याला रंगेहाथ पकडलं होतं तर चौकशीअंती मंदार वाईकर याला अटक केली होती परंतु यातील मुख्य सूत्रधार आरोपी प्रियदर्शन निकाळजे मात्र पसार झाली होती दरम्यान खंडणीविरोधी पथकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांना काल प्रियदर्शनी निकाळजे वानवडी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकाने तिला सापळा रचून अटक केली कोर्टात हजर केल्यानंतर तिला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.


दैनिक शिवस्वराज्य वेब पोर्टल साठी जिल्हा तालुका तसेच गाव पातळीवर प्रतिनिधी नेमणूक सुरू आहे तरी इच्छुकांनी 9022324656 या नंबरवर संपर्क साधावा.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads