महाराष्ट्र
हायटेक ३२०६ ज्वारीचे बोगस बियाणे! धरणगाव तालुक्यातील ५९ शेतकऱ्यांची व्यथा..! नुकसान भरपाई मिळावी, अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरणार; राष्ट्रीय किसान मोर्चा
धरणगाव - आधीच शेतकऱ्याच्या नशीबात संकट पाचवीला पुजलेले आहे. कधी अस्मानी संकट कोसळते तर, कधी सुलतानी संकट कोसळते. त्यातही आपल्या देशामध्ये शेतकऱ्याला लुटणारे सगळेच आहे. व्यापा-यापासून ते मजूरापर्यंत आणि खत विक्रेत्यांना पासून ते बी-बियाणं विक्रेते पर्यंत सगळेच लुटायला निघाले आहेत, आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मातीमोल मिळतो..! त्यातच पूर्ण साडेचार - पाच महिने रात्रंदिवस उन्हाथाणात, थंडीत आणि भर पावसाळ्यात मेहनत करूनही जर उत्पन्न पाहिजे तसे येत नसेल, व त्यातही शेतकऱ्यांना मालाला योग्य भाव मिळत नसेल तर मग वाईटच अवस्था.. याबाबत शेतकरी बांधव कुणाकडे साधी कैफियत सुध्दा मांडत नाही. आपल्या भारत देशाला कृषिप्रधान म्हटलं जातंय, परंतु खरं पाहिलं तर, शेतकऱ्याचा देशामध्ये खरोखर कोणी वाली नाही, हेच मात्र खरे आहे.!
याबाबत सविस्तर वृत्त असे की धरणगाव तालुक्यातील अत्याचारग्रस्त, अन्यायग्रस्त शेतकरी तुकाराम लटकन पाटील रा.वंजारी ता.धरणगाव जि. जळगांव यांनी हायटेक ३२०६ कंपनीचे ज्वारी वाणाचे तीन ३ बॅग बियाणे खरेदी केले. सदर हायटेक ३२०६ ज्वारी बियाणे खराब निघाले असून आम्ही सर्व ५९ शेतकऱ्यांनी डिसेंबर महिन्यात लागवड केली असता, या वाणाला शेतकऱ्यांनी उत्तम प्रकारे खताचे डोस व फवारणी केली, पिकाची वाढ चांगल्या प्रकारे झाली, व कणीस ही आले परंतु, कणसांमध्ये तर ज्वारी दाणे आले, लागले नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाया गेले आहे.
याबाबत वरील प्रकार घडल्याने आम्ही ५९ शेतकऱ्यांनी हायटेक ३२०६ (ज्वारी) कंपनी विरोधात कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. यापैकी आम्ही काही शेतकरी अगोदरच पूर्णतः कर्जबाजारी आहोत, त्यातच हायटेक ३२०६ या कंपनीने नकली बियाणे देऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
यासंदर्भात सर्व ५९ शेतकऱ्यांनी ज्वारी बियाणे बाबतीत झालेला प्रकार राष्ट्रीय किसान मोर्चाचे धरणगाव ता.अध्यक्ष मा.गोरख शिवाजीराव देशमुख यांना सांगितला. यासंदर्भात श्री. देशमुख यांनी सर्व शेतकऱ्यांना विश्वास दिला की, शेतकऱ्यांवर झालेला प्रकार आपण शासन, प्रशासनाला व कृषी अधिकारी यांना कळविणार.
वरील शेतकऱ्यांचे सर्व ज्वारी वाणाचे ३२०६ बियाणे हायटेक कंपनीचे असून व स्थानिक दुकानदारांकडून घेतले आहे. सर्व शेतकरी बांधवांकडे स्थानिक विक्रेत्याकडून बियाणे विकत घेतल्याची रितसर पावती आहे, यामधील शेतकरी तुकाराम लटकन पाटील यांनी सुमारे चार एकरामध्ये तीन बॅग उन्हाळी ज्वारीची पेरणी केली, पूर्ण साडेचार ते पाच महिन्याचा कालखंड लोटला. मात्र ज्वारीच्या कंणसामध्ये दाणे भरलेच नाही, पूर्णपणे बोगस बियाणे निघाले संबंधित शेतकरी धरणगाव व तालुक्यातील रहिवासी असून त्यांनी आपली व्यथा श्री.देशमुख यांच्याकडे मांडली.
कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे अशी रास्त अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. संबंधित असलेल्या ५९ शेतकरी बांधव हे स्थानिक बियाणे विक्री करणाऱ्या दुकानाचे संचालकाकडे गेले असता, ते शेतकर्यांना उडवाउडवीची उत्तरे देतात, व वेळ काढू भूमिका घेत आहेत. सर्व शेतकरी बांधवांची मागणी आहे की, हायटेक कंपनीची चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी, आणि आम्हा उपेक्षित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी एकमुखी मागणी तुकाराम लटकन पाटील रा.वंजारी ता.धरणगाव यांच्यासह इतर ५९ शेतकऱ्यांनी केली आहे.
राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष श्री.देशमुख यांनी सांगितले की, हायटेक ३२०६ कंपनीने
जर का शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई दिली नाही तर, आता खरीप चा हंगामामध्ये या कंपनीचे एकही वाण कृषी दुकानदारांना विकू देणार नाही. तसेच, सर्व कृषी दुकानदार बांधवांना विनंती आहे की, आपण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत मिळण्यासाठी प्रयत्न करावा. जर का शेतकरी बांधवांना न्याय मिळाला नाही तर, पुढील परिणामाचा विचार न करता आम्ही सर्व शेतकरी बांधव मुलाबाळांसह लवकरच रस्त्यावर उतरून उग्र आंदोलन करू, आमची राष्ट्रीय किसान मोर्चा ही संघटना फक्त गाव, जिल्हा पुरती नसून तर देश पातळीवर आहे, आम्ही सर्व देशभरात हायटेक कंपनीच्या विरोधात उभे राहून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असेही राष्ट्रीय किसान मोर्चाचे धरणगाव अध्यक्ष तथा किसान नेते गोरख शिवाजीराव देशमुख यांनी आमच्या प्रतिनिधींना सांगितले.
आमच्या सोबत पार्ट-टाइम काम करून Extra इनकम करण्याची संधी अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा