उपमहापौर राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून प्रभाग क्रमांक २४ मध्ये जलाराम नगर येथे तीन रस्त्याचे भूमिपूजन - दैनिक शिवस्वराज्य

उपमहापौर राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून प्रभाग क्रमांक २४ मध्ये जलाराम नगर येथे तीन रस्त्याचे भूमिपूजन



समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

सोलापूर : प्रभाग क्रमांक २4 मध्ये जलाराम नगर येथे तीन रस्त्याचे भूमिपूजन आज करण्यात आले उपमहापौर राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून करण्यात आले असून त्यासाठी उपमहापौर राजेश काळे यांनी 18 लाख रुपये दिले. असून तेथील काँक्रीट रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करताना जलाराम मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमास उपमहापौर राजेश काळे, मंडल अध्यक्ष श्री महेश देवकर, भारतीय जनता पक्षाचे डॉक्टर सरतापे, जलाराम नगर चे चेअरमन श्री बाळासाहेब भोसले तसेच सेक्रेटरी श्री बटगिरी साहेब, श्री कुंभार साहेब, अक्षय सोसायटीचे चेअरमन श्री अनिल उपरे साहेब, गोकुळ नगर चे श्री प्रदीप तडकल सर, प्रशांत थोरात, संतोष व्हणकोरे, श्री कोळी सर, पाच नंबर झोनचे अभियंता श्री अंत्रोळीकर व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
 गेले वीस वर्षापासून येथे कोणत्याही प्रकारची सुविधा देण्यात आले नाही व प्रथमच कॉंक्रीट रस्ते झाल्यामुळे तेथील रहिवासी यांनी पेढे वाटून आनंद व्यक्त केला.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads