राशिभविष्य
आजचे राशिभविष्य ३०-०६-२०२१
आजचे राशिभविष्य ३०-०६-२०२१
मेष :-
सार्वजनिक कार्यक्रमात आप्तेष्ट आणि मित्रांसमवेत वेळ खूप आनंदात जाईल . मित्रांसाठी खर्च करावा लागेल . त्यांच्याकडून लाभ होईल . निसर्गाच्या सान्निध्यात सहलीला जाल . सरकारी आणि निम - सरकारी कामात यश मिळेल . दांपत्य जीवनात सुख मिळेल व सुसंवाद राहील . नवीन स्त्रोत प्रकट होतील . अचानक धनलाभ होण्याची शक्यता श्रीगणेश सांगतात .
वृषभ :-
श्रीगणेश सांगतात की नवीन कामाचे नियोजन करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे . नोकरी व्यवसायात लाभदायक परिणाम मिळतील . पदोन्नती होईल . व्यापारात नवीन दिशा स्पष्ट होतील . सरकारकडून लाभ मिळण्याची बातमी मिळेल . मानप्रतिष्ठा वाढेल . अडलेली कामे पूर्ण होतील . गृहस्थीजीवनात माधुर्य राहील .
मिथुन :-
प्रतिकूल घटनांचा योग आल्याने आपल्या कामास विलंब लागेल . शरीरात स्फूर्ती आणि मनात उत्साह असणार आहे . पोटाचे विकार सतावतील . नोकरीत वरिष्ठांच्या नकारात्मक दृष्टीकोनाला बळी पडाल . राजकीय अडचणी व्यत्यय आणतील . महत्त्वाचे काम किंवा निर्णय आज स्थगित ठेवा असे श्रीगणेश सांगतात . संततीशी मतभेद होतील . प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांच्यापासून सावध राहा .
कर्क :-
श्रीगणेश सांगतात की मनातील नकारात्मकता नैराश्य निर्माण करेल . बाहेर खाण्यापिण्यामुळे तब्बेत बिघडेल . रागावर नियंत्रण ठेवावे लागेल . कुटुंबातील व्यक्तीशी भांडण होईल . नवे संबंध त्रासदायक ठरतील . पैशाची चणचण भासेल . दुर्घटना , शस्त्रक्रिया असे योग आहेत . ईश्वरभक्तीमुळे जरा दिलासा मिळेल .
सिंह :-
पती- पत्नीत किरकोळ कारणांनी खटका उडून मतभेद होतील . जीवनसाथीच्या तब्बेतीची चिंता राहील . प्रापंचिक गोष्टींबाबत उदासीन ल . सार्वजनिक जीवनात अपयश किंवा मानभंग होण्याचे योग श्रीगणेश सांगतात . भागीदारांशी मतभेद होतील . भिन्न लिंगीय व्यक्तीशी मुलाखात होईल पण ती आनंददायक ठरणार नाही . कोर्ट - कचेरीतील प्रश्न सुटायला विलंब लागेल .
कन्या :-
शारीरिक , मानसिक स्वास्थ्य राहील . घरात शांती- सुखाचे वातावरण मनाला प्रसन्ना देईल . आर्थिक लाभ आणि कामात यश मिळेल . आजारातून मुक्त व्हाल . नोकरीत फायदा मिळेल . आपल्या हाता खालचे कर्मचारी आणि सहकारी यांचे सहकार्य मिळेल . श्रीगणेशाच्या आशीर्वादाने प्रतिस्पर्थ्यांवर विजय मिळवाल .
तूळ :-
श्रीगणेश सांगतात की आज कल्पनाशक्ती आणि सृजनशक्ती यांचा चांगला उपयोग कराल . संततीची प्रगती होईल . प्रिय व्यक्तीची भेट रोमांचक ठरेल . तन आणि मन तरतरी आणि स्फूर्तीचा अनुभव घेईल . विचारांचा अतिरेक मन विचलित करेल . आज एखाद्याशी बौद्धिक चर्चा किंवा वादविवादाची संधी येईल पण त्यात फार खोलात उतरू नका असे श्रीगणेश सांगतात .
वृश्चिक :-
शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या भीतीचा अनुभव घ्याल असे श्रीगणेश सांगतात . कोणती ना कोणती चिंता सतावेलच . कुटुंबातील सदस्य , नातलग व संबंधित यांच्याशी पटणार नाही . आईची तब्बेत बिघडेल . जमीन , वाहन इ . च्या खरेदीपत्रा बद्दल सावध राहा .
धनु :-
गूढ रहस्यमय विद्या आणि अध्यात्माकडे आकर्षण राहील . नवीन कार्यारंभास चांगला दिवस आहे . मित्र आणि आप्तेष्टांच्या आगमनाने घरात आनंद राहील . हाती घेतलेली कामे यशस्वी होतील . जवळचा घडेल . धनलाभाचा योग आहे . लहान भावंडांशी चांगले सुत जमेल . मानप्रतिष्ठा वाढेल . प्रिय व्यक्तीशी मुलाखात होण्याची शक्यता आहे .
मकर :-
श्रीगणेश आपली उक्ती आणि कृती यावर संयम ठेवण्याचा सल्ला देतात . कुटुंबात मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्या . शेअर- सट्टा बाजार यात गुंतवणूक कराल . आर्थिक लाभ होईल . तब्बेतीच्या काही तक्रारी राहतील . डोळ्यांचा त्रास जाणवेल . नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने लाभ होईल . विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करावे लागेल .
कुंभ :-
शारीरिक , मानसिक दृष्टया प्रफुल्लित राहाल . नातलग , मित्र , कुटुंबीय यांच्यासह घरात उत्सवाचे वातावरण राहील . स्वादिष्ट भोजन मिळेल . पर्यटनाचा बेत आखाल . आर्थिक दृष्ट्या लाभाचा दिवस . अध्यात्म व चिंतनात गोडी वाटेल .
मीन :-
आर्थिक नियोजन व गुंतवणूक करताना खूप दक्ष राहा असे श्रीगणेश सांगतात . एकाग्रता कमी असेल त्यामुळे बेचैन राहाल . धार्मिक कार्यावर खर्च होईल . मित्र- स्वकीयांशी मतभेद होतील . लालसा नुकसान करेल . जामीन किंवा कोर्ट कचेरी प्रकरणात न पडणे अधिक चांगले ठरेल .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा