महाराष्ट्र
ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे भारतीय जनता पार्टी पुणे शहरच्या वतीने चक्काजाम आंदोलन
आज दिनांक 26 जून 2021 रोजी महाविकास आघाडी या राज्य सरकारने ओबीसी आरक्षण रद्द केल्यामुळे या आघाडी सरकारविरोधात भारतीय जनता पार्टी पुणे शहर आणि भाजपा ओबीसी आघाडी पुणे शहर यांच्या वतीने कात्रज चौकामध्ये 2 तास चक्काजाम आंदोलन करण्यात आले.. या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय सचिव माननीय पंकजाताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तसेच आंदोलनामध्ये पुणेनगरीचे खासदार गिरीश जी बापट, पर्वती मतदार संघाचे आमदार माधुरी ताई मिसाळ, भाजपा पुणे शहर अध्यक्ष जगदीश जी मुळीक, माननीय मेथाताई कुलकर्णी, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमदार सुनील भाऊ कांबळे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत जी रासने, सरचिटणीस गणेश जी घोष, दीपक जी नागपुरे तसेच कोंढवा बु च्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमती रंजनताई टिळेकर,नगरसेविका सौ वृषाली ताई कामठे,हडपसरचे युवा नेते श्री चेतन टिळेकर,युवा नेते श्री अमर गव्हाणे,भाजपा ओबीसी आघाडी पुणे शहर अध्यक्ष योगेश जी पिंगळे आणि नगरसेवक पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा