महाराष्ट्र
मंगळवेढयात मका हमी भाव खरेदी केंद्राचा शुभारंभ
सलिम शेख मंगळवेढा ता प्रतिनिधी
मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ राज्य सहकारी फेडरेशन व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने मका हमी भाव खरेदी केंद्राची सुरुवात होणार आहे अशी माहिती तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन सिध्देश्वर आवताडे यांनी माहिती दिली.
सदरच्या कार्यक्रमासाठी तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनराव आवताडे, तहसीलदार स्वप्निल रावडे, सहाय्यक निबंधक प्रमोद दुरगुडे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मका खरेदी दर १८५० रूपये प्रति क्विंटल असणार आहे व हेक्टरी १८.४८ क्विंटल याप्रमाणे दर शासनाकडून निश्चित करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी मका विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी मंगळवेढा तालुका सहकारी खरेदी विक्री संघ कार्यालयात झाल्यानंतर मका विक्रीसाठी घेऊन यावे अशी माहिती खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक शंभू नागणे यांनी केली आहे.
मंगळवेढ्यात शेतकऱ्यांचा शेतीमाल विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ निर्मितीसाठी तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय बबनराव आवताडे यांनी वेळोवेळी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने हमीभाव खरीदी केंद्र मंजूर झाला आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा