महाराष्ट्र
सुमितभाऊ राठोड व निखीलभाऊ राठोड यांना ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने समाजरत्न पुरस्कार
आज माहुली गावातील दोन रत्न म्हणजेच त्यापैकी एक आदरणीय सुमितभाऊ राठोड व दुसरे म्हणजेच त्यांचेच लहान बंधु आदरणीय निखिलभाऊ चव्हाण या दोन रत्नामुळे माहुली गावाचे नाव चांदया पासुन तर बांदया पर्यंत पंचकोशीत ओळखले जात आहे. आज पर्यंत त्यांनी कशाचीही पर्वा न करता रात्र दिवस त्यांनी एकच ध्यास घेऊन निसर्गाची सेवा करण्याचे व्रत अंगिकारले व त्या कामी त्यांना गावातील तरुण मित्रमंडळीनी व सरपंच रामभाऊ राठोड यांनी मोलाचे प्रोत्साहन दिले आणि आज या दोन्ही गरुड़झेप घेणाऱ्या सुपुत्रांना ग्रीन फाऊंडेशनच्या वतीने समाजरत्न पुरस्काराने गौरवविन्यात आले तसे तर त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कार मिळाले आहेत त्यामध्ये पक्षीमित्र वृक्षमित्र पर्यावरण मित्र असे अनेक पुस्कारांनी या दोन्ही भावांना गौरवन्यात आले आहे त्याचाच एक भाग म्हणून आज दिनांक २९/०६/२०२१ रोजी पर्यावरण प्रेमी पक्षीप्रेमी व वृक्ष मित्र पुरस्कार प्राप्त आदरणीय श्री निखिल चव्हाण यांचा जि प उच्च प्राथ शाळा माहुलीचे वतीने शाळेचे मुख्याध्यापक श्री अघडते सर व तंत्रस्नेही शिक्षक आदरणीय हाके सर व राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदरणीय गुजर मॅडम याचे हस्ते त्यांचा पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांचेच मित्र आदरणीय सुमितभाऊ हे गडचिरोली येथे कर्तव्यावर असल्यामुळे त्यांना मोबाइलवरुणच अभिनंदन व शुभेच्छाचा वर्षाव केला या दोन्ही रत्नाना याही पुढे असेच जात राहवे असे माहुली ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा