स्पर्धक क्रमांक ६२ साहिल विनोद कडोलकर कुडाळ - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक ६२ साहिल विनोद कडोलकर कुडाळ



राजा शिवछत्रपती

                छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील महान तसेच आदर्श राजा होते. त्यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी या किल्ल्यावर झाला. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई तर वडिलांचे नाव शहाजी भोसले हे होते. शिवरायांचे बालपण खूप धामधूमीत गेले. त्यांनी वयाच्या १२व्या वर्षापर्यंत आई जिजाऊच्या देखरेखेखाली व शहाजी राजांनी नेमलेल्या नामवंत शिक्षकाकडून अनेक कला, विदया, भाषा अवगत केल्या.
               शिवरायांपूर्वी सुमारे ४०० वर्षे महाराष्ट्रात स्वराज्यानव्हते. महाराष्ट्राचा बहुतांश भाग अहमदनगरचा निजामशहा व विजापूरचा आदिलशहा यांच्या सत्तेत होता. याविरुद्ध लढण्यासाठी व जनतेला कायमचे सुखी करण्यासाठी शिवरायांनी स्वराज्याचे पवित्र कार्य हाती घेतले. त्यांनी वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. शिवराय जरी वयाने लहान असले तरी त्यांच्या मनाची भरारी प्रचंड मोठी होती. त्यांनी महाराष्ट्रात जीवास जीव देणारे मावळे निर्माण केले शिवरायांनी विजापूरच्या दरबारातील भारी सरदार अफजलखानास शक्तीपेक्षा युक्तीने धुळीस मिळवले. त्यांच्या आयुष्यात घडलेला प्रत्येक प्रसंग महाराष्ट्रासप्रेरणा देतो.
                शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या तंत्राचा अव लंब करून अनेक गड किल्ले जिंकले. या तंत्राचा वापर करताना त्यांना सह्याद्री पर्वतातील घनदाट जंगल, डोंगरी किल्ले, प्रजेचा पूर्ण पाठिंबा मिळाला, शिवाजी महाराजांनी वनदुर्ग, गिरिदुर्ग व जलदुर्ग हे तीन प्रकारचे किल्ले बांधून लोकांमध्ये देशप्रेम व आत्मविश्वास निर्माण केला.
               शिवरायांनी इंग्रज, सिद्दी व पोर्तुगीज यांना दरारा वाटावा असे भक्कम आरमार उभारले. शिवाजी राजांना भारतीय आरमाराचे जनक म्हटले जात. त्यांनी आपल्या स्वराज्यात कधीही कोणताही भेदभाव केला नाही. संताचा, विद्वानाचा सत्कार केला. मंदिर व मशिदींचे रक्षण केले. पर्यावरण संरक्षणाला प्राधान्य दिले. स्त्रियांचा सन्मान केला.
                असा हा आदर्श पुत्र, कुशल संघटक, रयतेचा वाली, दुर्जनांचा कर्दनकाळ व सज्जनांचा कैवारी, थोर राष्ट्रपुरुष ३ एप्रिल १६८० रोजी जनतेला दुःखसागरीत लोटून अनंतात विलीन झाला.

10 Comments to

  1. सुंदर निबंध साहिल👍
    छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩

    उत्तर द्याहटवा
  2. थोड्या आणि आकर्षक शब्दात शिवरायांची माहिती लिहिलीय 🔥🔥

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads