राजकीय
शरद पवार वर्षावर दाखल, राजकीय हालचालींना वेग
राकेश कोळी उपसंपादक :-
मुख्यमंत्र्याच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानावर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. सोमवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शरद पवार स्वतः वर्षावर दाखल झाल्याने सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे.
मंगळवारी दुपारी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे दाखल झाल्यानंतर संध्याकाळी ४ च्या सुमारास स्वत: शरद पवारही वर्षा बंगल्यावर दाखल झाले. या भेटीमागे अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीचं कारण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अनिल देशमुखांना ईडीने समन्स बजावल्यानंतर मात्र अनिल देशमुखांनी प्रत्यक्ष चौकशीला येण्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशी घेण्याची विनंती करत सात दिवसांची मुदत मागितली आहे. त्याला ईडीने ही परवानगी दिली आहे. ईडीच्या चौकशीअंती अनिल देशमुखांना अटक झाली तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का असेल. या सर्व पार्श्वभूमीवरच वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची चर्चा होऊ असल्याचा अंदाज सर्वत्र वर्तविण्यात येत आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची तीन दिवसात दोन वेळा भेट घेतल्यानंतर सोमवारी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटंन तिथूनच ते शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाले. या सर्व घडामोडीमुळे राजकीय हालचालींना वेग आला असून सर्वत्र राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा