ऑनरी लेफ्टनंट अधिकारी सुभाष सनदी यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार - दैनिक शिवस्वराज्य

ऑनरी लेफ्टनंट अधिकारी सुभाष सनदी यांचा सेवानिवृत्ती पर सत्कार



सलीम शेख तालुका प्रतिनिधी :-

मंगळवेढा. मारोळी गावचे सुपुत्र असणारे सुभाष बुराणसो सनदी हे ३३ वर्ष ०६ महिने असा प्रदीर्घ काळ देश सेवा करून सेवानिवृत्त झाले त्यांच्या या कार्याची दखल घेत महाराष्ट्र जिल्हा परिषद अल्पसंख्यांक संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री जमीर शेख सर यांच्या वतीने भव्य असा नागरी सत्कार करण्यात आले.
 सनदी हे घरची परिस्थिती बेताची असताना 1987 साली सैन्यात भरती झाले. सैन्यदलात ते हवालदार पदापासून त्यांचा प्रवास ऑनरी लेफ्टनंट पदापर्यंत अत्यंत बिकट व साहसी प्रवास झाला. 33 वर्षाच्या प्रदीर्घ देश सेवेत त्यांनी हवालदार, नाईब सुभेदार ,सुभेदार ,सुभेदार मेजर अशा विविध पदावर उत्कृष्ट कार्य केले. यांच्या या कार्याची दखल घेत भारत सरकारने 26 जानेवारी 2021 रोजी त्यांना ऑनरी लेफ्टनंट पदी बढती देऊन सन्मान केला. त्यांनी आपल्या कार्यकाळात जम्मू काश्मीर ,श्रीनगर ,लडाख ,आसाम, मणिपूर ,चंदिगड ,पुणे या ठिकाणी उत्कृष्ट अशी देशसेवा बजावली. सैन्यदलातील वेगवेगळ्या व महत्त्वाच्या मोहिमेत सुभाष सनदी यांचा सहभाग होता.
विशेष म्हणजे या एकाच कुटुंबातील तीन भावंडे अंबिरदिन सनदी, अमुलाल सनदी, सुभाष सनदी हे तिन्ही भावंडे सैन्यदलात वेगवेगळ्या पदावर राहून देश सेवा बजावली हे तालुक्यांतच नव्हे तर जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अल्पसंख्यांक संघटनेचे जमील काजी, दिलावर सनदी,  आमिर तांबोळी, अस्लम जहाभाई, अमजद इनामदार, शमशुद्दीन इनामदार, सोहेल नाईक, जावेद आत्तार यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलावर सनदी यांनी केले व आभार प्रदर्शन आमिर तांबोळी यांनी मानले.

Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads