खेड पोलिसांची धडक कारवाई ; गांजा विकणारा गजाआड - दैनिक शिवस्वराज्य

खेड पोलिसांची धडक कारवाई ; गांजा विकणारा गजाआड


राकेश कोळी उपसंपादक :-

खेड तालुक्यातील लवेल येथे गांजा विक्री करणाऱ्या प्रौढाला खेड पोलिसांनी सापळा रचून रंगेहाथ पकडून गजाआड केले. पोलिसांनी या करवाईमध्ये ४८,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून जप्त केला आहे.
दिनांक १७/०६/२०२१ रोजी पोलीस कॉन्स्टेबल अजय कडु नेमणुक खेड पोलीस ठाणे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन विश्वसनीय माहीती मिळाली की, खेड पोलीस ठाणे हदीत समाधान हॉटेल जवळ, लवेल ता. खेड जि.रत्नागिरी परिसरामध्ये इस्तीयाक अकादीर शहा (वय ४८ वर्षे, रा. घाणेखुंट, गवळीवाडी ता.खेड जि. रत्नागिरी) हा सफेद रंगाची इंडीगो कार क्रमांक (एमएच-०६-सी ६४३६) मधुन दिनांक १७ जून २०२१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सोबत गांजाचा साठा घेवुन खास ग्राहकांना विक्री करण्यासाठी येणार आहे.

याची माहीती मिळताच त्याबाबत वरिष्ठांना अवगत करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई संकेत गुरव, पोलीस शिपाई अजय कडू, साजिद नदाफ यांच्या पथकाने दिनांक १७ जून २०२१ रोजी रात्रौ ९.१५ वाजण्याच्या सुमारास दोन पंच, वजन काटा धारक यांच्यासह आरोपीत इस्तीयाक अकादीर शहा (वय ४८ वर्षे, रा. घाणेखुंट, गवळीवाडी ता. खेड जि. रत्नागिरी) हा त्याचे ताबे कब्जात ७५००/- रुपये किंमतीचा ५१४ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, ४०,०००/- रुपये किंमतीची सफेद रंगाची इंडीगो कार क्रमांक (एमएच-०८ सी-६४३६) हे चारचाकी वाहन, मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकुण ४८,५००/- रुपये किंमतीचा मुद्देमालासह रंगेहाथ पकडुन त्याच्या विरुद्ध खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर-२७७/२०२१ अंमली औषधी द्रव्य व मन प्रभावी पदार्थ अधिनियम १९८५ कायदा कलम ८ (क). २० (ब) (२) २२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्ह्यातील आरोपीत याला अटक करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे हे करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती देसाई मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री काशीद, पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी पार पाडली.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads