महाराष्ट्र
लॉकडाऊनमध्ये विदेशी दारू विकणारा गजाआड : खेड पोलिसांची कारवाई
राकेश कोळी उपसंपादक :-
खेड : लॉकडाऊनचा गैरफायदा घेवून चढ्या भावाने विदेशी मद्याची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या 41 वर्षीय प्रौढाला खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे व त्यांच्या पथकाने रंगेहाथ पकडून गजाआड केले. या प्रौढकडून पोलिसांनी १५ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला.
दिनांक १५ जून २०२१ रोजी पोलीस कॉन्स्टेबल राहुल कोरे यांना त्यांचे गुप्त बातमीदाराकडुन विश्वसनीय माहीती मिळाली की, मौजे सुसेरी नं. २, ता.खेड जि. रत्नागिरी येथील राहणारे तुषार तानाजी बावकर हे सध्या कोविड-१९ च्या अनुषंगाने लॉकडाऊन सुरु असल्याचा फायदा घेवुन आपले घराचे पाठीमागे मोकळ्या जागेत गैरकायदा बिगरपरवाना देशी-विदेशी बनावटीच्या कंपनीच्या दारुच्या बाटल्या आपले कब्जात बाळगुन चढ्या भावाने ग्राहकांना बेकायदेशीर रित्या विक्री करत आहे. या बाबतची माहीती मिळताच त्याबाबत वरिष्ठांना अवगत करुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस शिपाई संकेत गुरव, अजय कडु, किरण चव्हाण यांच्या पथकाने दिनांक- १५ जून २०२१ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुषार तानाजी बावकर (वय ४१ वर्षे, मौजे सुसेरी नं. २ ता.खेड जि. रत्नागिरी) याचे घर परिसरात धाड टाकुन १५,०००/- रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा गैरकायदा बिगरपरवाना लोकांना चढ्याभावाने विक्री करणेसाठी आपले ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत रंगेहाथ पकडुन त्याचे विरुध्द खेड पोलीस ठाणे गुन्हा रजि. नंबर-२६९/२०२१ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपीत याला अटक करण्यात आले आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास खेड पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक मोहीतकुमार गर्ग, अपर पोलीस अधिक्षक श्रीमती देसाई मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. काशीद, पोलीस निरीक्षक श्रीमती निशा जाधव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांनी पार पाडली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा