महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन - दैनिक शिवस्वराज्य

महान धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन


राकेश कोळी उपसंपादक :-

भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते. मिल्खा सिंग यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर 30 मे रोजी रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. मिल्खा सिंग यांच्या शरिरातील ऑक्सिजन कमी झाल्यामुळे त्यांना पीजीआयएमआर नेहरु हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. गुरुवारी त्यांची कोरोना चाचणी 
देखील निगेटिव्ह आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून मिल्खा सिंग यांना आदरांजली वाहिली आहे. मिल्खा सिंग यांच्या निधनामुळे आपण महान खेळाडूला मुकलो आहोत. त्यांनी देशाच्या असंख्य नागरिकांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केलं होतं, असं नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांच्यासारखं प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्यातून निघून जाणं हे फार दुख:द आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
मिल्खासिंग यांच्या जीवनावर चित्रपट मिल्खा सिंह यांच्या जीवनावर 'भाग मिल्खा भाग' या नावाचा चित्रपट देखील बनवण्यात आला होता. मात्र,चित्रपटात मिल्खा सिंह यांच्या जीवनातील थोडासाच संघर्ष दाखवण्यात आला होता. फ्लाईंग सिख या नावाने देखील ते प्रसिद्ध होते. मिल्खा सिंह यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता. मिल्खा सिंह यांनी 1968 कॉमनवेल्थ गेम्समध्ये विजेतेपद मिळवलं होतं. 1960 च्या ऑलम्पिक स्पर्धेत ते चैौथ्या स्थानावर राहिले होते भाग घेतला होता.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads