सर्वात सुंदर होणार जुळे सोलापूर - दैनिक शिवस्वराज्य

सर्वात सुंदर होणार जुळे सोलापूर



 समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

सोलापूर:  जुळे सोलापूर मधील देविका गॅस एजन्सी च्या बाजूला वसुंधरा कॉलेज च्या समोर. एक एकर मध्ये भव्य अशी अतिशय सुंदर बगीचा लवकरच होणार व दुसरी बगीचा शिवगंगा नगर व म्हाडा च्या बाजूला असणाऱ्या दीड एकर मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी सर्व प्रकारची खेळणी, ओपन जिम,  वॉकिंग ट्रॅक व अतिशय सुबक असे बाकडे मंजूर केले असून येत्या काही दिवसात या कामाचा शुभारंभ माननीय सुभाष बापू देशमुख व सोलापूर शहराचे आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते होणार असून उपमहापौर राजेश काळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून याची पाहणी करण्यासाठी उपमहापौर राजेश काळे शहर अभियंता श्री संदीप जी कारंजे साहेब, उप अभियंता श्री अवताडे, साहेब उद्यान प्रमुख श्री निशिकांत कांबळे व तेथील स्थानिक नागरिक व शिवरत्न सोसायटीचे चेअरमन श्री ओमकार ढेकळे, अनु जाधव हे उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads