मोयगांव-टाकळी खुर्द रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे; शेतकरी व नागरिकांची तक्रार - दैनिक शिवस्वराज्य

मोयगांव-टाकळी खुर्द रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे; शेतकरी व नागरिकांची तक्रार


नितीन इंगळे जामनेर तालुका प्रतिनिधी :-

जळगाव जिल्हा परिषद अंतर्गत ५०-५४ योजनेत ३८-४५ लाख निधी खर्चुन तालुक्यातील मोयगाव बु - टाकळी रस्त्याचे काम सुरु आहे. रस्त्याच्या बाजूस असणार्‍या साईट पट्ट्या मूरुम न टाकता माती टाकलेली असल्याचे निष्कृष्ठ दर्जाचे काम सुरु आहे अशी माहिती स्थानिक शेतकरी व नागरीकिंनी प्रतिनिधीशी बोलतांना दिली. तर गेल्या दिवसांत रस्ता बनविला असता साईड पट्टी दबलेल्या आहे.
      रस्ता बनवितांना रस्त्याची दबाई, खडीकरण व डांबरीकरण करतांना समाधानकारक काम न झाल्याचे परिसरातील शेतकरी व नागरीक सांगत आहे. पावसाळ्याच्या दिवसात नागरीकांना रहदारीस कसरत करून दळणवळण करावे लागत आहे. मोटर सायकल चे किरकोळ अपघात घसरुन होत आहे. 
       तरी जि.प. बांधकाम विभागातील गावच्या अधिकार्‍यांने र्दुलक्ष न करता लवकरात लवकर संबंधित ठेकेदाराला याबाबत महत्वपूर्ण सुचना देवून कामाचा दर्जा समाधानकारक करण्यास सांगावे जेणेकरून अपघात व रहदारी सुलभ होईल, असेही नागरीक बोलत होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads