स्पर्धक क्रमांक २१ वर्षा विश्वास पाटील - दैनिक शिवस्वराज्य

स्पर्धक क्रमांक २१ वर्षा विश्वास पाटील

जय भवानी......
जय शिवाजी...
प्रतिपचंद्रलेखेव वर्धिष्णूविश्ववंदीता
शाहसूनो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
        ही शिवाजी महाराजांची राजमुद्रा आपण खूपदा ऐकली असेल, याचा अर्थ असा की "ज्या प्रमाणे प्रतिप्रदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पूत्र शिवाजी ची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल, त्यांचे हे राजब्रीदवाक्य म्हणूनही ओळखले जाते. 
           अश्या माझ्या शिवाजींचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ला, पुणे येथे झाला
          छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे अनेक सद्गुणांचा समुच्या होय. सुर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच समजला नसता.... जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरच हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता, माझ्या शिवाजींना स्वराज्याचा लागला होता ध्यास, स्वराज्य मिळवणे ही एकच होती त्यांची आस.
           स्वातंत्र्याची उत्कट आकांक्षा, स्वातंत्र्य प्राप्त करण्यासाठी कोणतेही जोखीम पत्करण्याची तयारी, शत्रूला निधड्या छातीने भिडण्याचे  धैर्य, युध्द जिंकण्याकरीता प्रभावी डावपेच आखण्यासाठी आवश्यक असलेली कुशाग्र बुद्धिमत्ता, रणांगणात स्वतः आघाडीवर राहण्याची तत्परता, धार्मिक  सहिष्णुता आणि या सर्वांचे अधिष्ठान म्हणून विशुद्ध शील भारताचे प्रेरणास्रोत म्हणजेच की शिवरायांना रयतेचा राजा असे ही म्हटले जाते. 
         शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का? जिवाशी असा शब्द तयार होतो, जो आयुष्यभर जिवाशी खेळला तो शिवाजी! अरेsss! गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा.......शाळेत नाताळ निमित्त मुलांना जशी सांता क्लॉज ची टोपी घालून बोलवतात, तसे एकदा शिवजयंती निमित्त मुलांना भगवा फेटा घालून बोलवा, बघा पोरं कशी रुबाबदार दिसतील.

          इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारा "राजा शिवछत्रपती"
        अरेsss!!! माझ्या राजा बद्दल एकच सांगावेसे वाटते-
         विजेसारखा तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला,
स्वर्गात गेल्यावर ज्याला देवांनी झुकून मुजरा केला,
असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला... असा मर्द मराठा शिवबा होऊन गेला.... ⛳
            अश्या माझ्या राजाला शत: शत: प्रणाम..
शत: शत: प्रणाम.....

     जय शिवराय
Previous article
Next article

30 Comments to

  1. अप्रतिम निबंध
    Verry Nice
    जय भवानी जय शिवाजी 🚩🚩

    उत्तर द्याहटवा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads