Blog
स्पर्धक क्रमांक १७ ऐश्वर्या किसनराव घुंबरे परभणी
निबंधाचा विषय:राजा शिवछत्रपती
छ : म्हणजे छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र : म्हणजे त्रस्त मोगलांना करनारे,
प : म्हणजे परत न फिरणारे,
ति : म्हणजे तिन्ही जगात जाणणारे,
शि : म्हणजे शिस्तप्रिय,
वा : म्हणजे वाणिज्य तेज,
जी : जिजाऊंचे पुत्र,
म : महाराष्ट्राची शान,
हा : म्हणजे हार न मानणारे,
रा : राज्याचे हितचिंतक,
ज : जनतेचा राजा...
छत्रपती शिवाजी महाराज
यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले आणि
त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. शिवाजी महाराज हे भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. स्वतंत्र साम्राज्याचे स्वप्न साकार करणारे स्वराज्य संस्थापक श्री छत्रपती शिवाजीराजे भोसले हे एक थोर कर्तृत्ववान पुरूष होते आणि त्यांचे वडिल शहाजी राजे भोसले हे त्या काळी सरदार म्हणून कार्यरत होते. शिवरायांचे बालपण हे अति संस्कारित घडले होते. शहाजी राजे आणि जिजाऊंनी शिवरायांना जडण-घडण बालपणीच केल्यामुळे शिवाजी महाराजांना युद्धकला बालपणीच येत होती जसे की तलवार चालविणे, भाला फेकणे, धावणे, गड चढणे, घोड्यावर बसणे, तुडुंब विहीरीत वाहत्या नदीच्या पात्रात पोहणे. रात्री अपरात्री जंगलात जाणे इत्यादी प्रयोग शिवाजी राजे बालपणीच करत असत.
शिवाजी महाराज पराक्रमी चपळ आणि निर्भिड होते आळस हा प्रकार राजांच्या जीवनकोशात नव्हता. राजे नियमित व्यायाम करत असत. "राजांच्या मुखावर नेहमी हास्य असे. शिवाजी महाराज जेवढे प्रेमळ होते तसेच गरीबांच्या सुखासाठी व दुर्जनांच्या नाशासाठी कठोर देखील होते. शिवाजीराजांची नजर तीक्ष्ण आणि भेदक होती. राजे मानसशास्त्राचे चांगले जाणकार होते.जिज्ञासा, चातुर्य, युक्तिवाद या गुणांनी राजांचे व्यक्तिमत्त्व ओतप्रोत भरलेले होते. शिवाजी राजांचे प्रजेवर फार प्रेम होते, राजांनी कधीही कोणाला फसवले नाही. पण गरीबांना फसविणारांना मात्र राजांनी कायमची अद्दल घडवी कमीत कमी जेवन हा राजांचा आहार होता. अति अन्न सेवनांने शिथिल -ता येते व उमेद संपते, असे शिवराय मानत राजे सैनिकांसोबत जेवत जे सैनिक, मित्रांना तेच अन्न स्वतः घेत असत.
शिवरायांना व त्यांच्या सहकाऱ्यांना सुपारीचे देखील व्यसन नव्हते. आपल्या देशबाधंवाना सांगितले, " ज्याला यश पाहिजे त्याने स्त्रि अभिलाषा धरू नये, परस्त्री आई समान मानावी ." शिवाजी राजे स्वतः चारित्र्य संपन्न असल्यामुळे त्यांचे सर्व सहकारी, सैनिक व प्रजा नितीमान होती, शिवाजी राजे म्हणजे जगातील आदर्श नेतृत्व आहे. शिवाजी राजांचा राजकीय व्यवहार स्वच्छ होता. शिवकाळात भ्रष्टाचार झाला नाही' प्रजेच्या गवताच्या काडीला व भाजीच्या देठाला हात लावू नका, गावच्या पाणवठ्यावरचे पाणी गरजेपेक्षा जास्त घेऊ नका, मोबदल्याशिवाय शेतकर्यांची फळे तोडु नका, झाडे तोडू नका, हवेच असेल तर जीर्ण झालेले झाड तोडा सांगितले पण त्या ठिकाणी दुसरे नवीन झाड लावा अशी प्रजेची काळजी घेणारे राजे जगात फक्त "शिवाजी राजेच " झाले
शिवाजी या नावाला कधी उलटे वाचुन पहा?
जिवाशी असा शब्द तयार होतो.
जो आयुष्यभर जिवाशी खेळला तो शिवाजी!
सिंहाची चाल,
गरुडाची नजर,
स्त्रीयांचा आदर,
शत्रुचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवन.........
... धन्यवाद...
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा