राशिभविष्य
आजचे राशिभविष्य २७-०६-२०२१
मेष :-
श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस आपल्याला मिश्र फल देणारा असेल . कुटुंबियांबरोबर बसून महत्त्वपूर्ण चर्चा कराल . घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल . कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकाऱ्याबरोबर महत्त्वपूर्ण चर्चा होईल . सरकारी फायदा मिळण्याची शक्यता आहे . नोकरी संबंधी कामासाठी प्रवास घडेल . काम वाढेल . शारीरिक थकवा जाणवेल . आईकडून लाभ होऊ शकतो .
वृषभ :-
श्रीगणेशजी सांगतात की नवीन कामांची प्रेरणा मिळेल आणि तुम्ही त्यांची सुरुवातही करु शकाल . एखादया धार्मिक स्थळाला भेट देऊन तुमची वृत्तीही धार्मिक बनेल . दूरच्या प्रवासाचे योग आहेत . दूरवरच्या मित्रांच्या शुभवार्ता समजतील . परदेश जाण्याचे योग येऊ शकतात . व्यापारात आर्थिक लाभ होऊ शकतो . आरोग्य मध्यम राहील .
कर्क :-
श्रीगणेश सांगतात की आजचा पूर्ण दिवस आनंद , उत्साह आणि मनोरंजनात जाईल . भिन्न लिंगीय व्यक्ती भेटतील . आनंदाची साधने , वस्त्रे इ . खरेदी होईल . प्रणय विषयक यश मिळेल . स्वादिष्ट भोजन आणि वाहन सुखाचे योग आहेत . प्रतिष्ठा वाढेल . व्यावसायिक क्षेत्रात लाभदायी दिवस . तब्बेत चांगली राहील .
सिंह :-
संमिश्र फलदायी दिवसाचे भाकित श्रीगणेश सांगतात . घरात शांतता नांदेल . नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य कमी मिळेल . दैनिक कामात अडथळे येतील . शत्रू आणि प्रतिस्पर्ध्यामुळे त्रास होईल . उच्च अधिकाऱ्यांशी वाद टाळा . माहेरहून चिंता वाढविणाऱ्या बातम्या मिळतील . आज उदासीनता व साशंकता जास्त राहील . त्यामुळे मन उदास राहील . तब्बेत साधारण राहील . खूप परिश्रम करुनही यश अल्प मिळण्याचे संकेत श्रीगणेश देत आहेत .
मकर :-
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल . नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल . पदोन्नती मिळण्याचे योग आहेत . गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील . शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा . धडपडणार नाही याची दक्षता घ्या . मित्र परिवार आणि स्नेही यांची भेट होईल . मानसिकदृष्टया शांती लागेल .
तूळ :-
आज मानसिक थकवा जाणवेल असे श्रीगणेश सांगतात . जास्त हळवे बनाल . मनात उठणाऱ्या विचारतरंगांमुळे त्रास होईल . आई आणि स्त्री विषयक चिंता सतावेल . प्रवासासाठी प्रतिकूल दिवस . पाण्यापासून जपा . झोप पूर्ण न झाल्याने मानसिक ताण येईल . कौटुंबिक तसेच जमीन मालमत्ता या विषयी सावध राहा .
वृश्चिक :-
श्रीगणेश वर्तवितात की आज दिवसभर आपण आनंदी राहाल . नवीन कार्याचा आरंभ कराल . सहकाऱ्यांकडून सुख व आनंद मिळेल . मित्र व नातलगांची भेट होईल . कोणत्याही कामात आज यश मिळेल . आर्थिक फायदा व भाग्योदयाचे योग आहेत . भावा- बहिणींकडून लाभ होतील . प्रतिस्पर्थ्यांवर विजय मिळवाल . स्नेहसंबंध जुळतील . छोटे प्रवास होतील .
धनु :-
मध्यम फलदायी दिवसाची शक्यता श्रीगणेश सांगतात . नाहक खर्च होईल . मनात मरगळ असेल . कुटुंबीयांशी गैरसमज वाढतील त्यामुळे मनस्ताप होईल . कामात अपेक्षित यश मिळणार नाही . दविधा मनःस्थितिमुळे कोणताही निर्णय घेऊ शकणार नाही . म्हणून आज कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका . असे श्रीगणेश सांगतात . दूर राहणाऱ्या नातलगांकडून संदेश व्यवहार होतील . त्यामुळे लाभ होईल . कामाचा व्याप वाढेल .
मकर :-
श्रीगणेशाच्या आशीर्वादाने आज आपले प्रत्येक काम सहजपणे पार पडेल . नोकरी- व्यवसायात आपली प्रतिष्ठा वाढेल . पदोन्नती मिळण्याचे योग आहेत . गृहस्थी जीवनात आनंदी वातावरण राहील . शारीरिक दुखापतीचे योग असल्याने सांभाळून राहा . धडपडणार नाही याची दक्षता घ्या . मित्र परिवार आणि स्नेही यांची भेट होईल . मानसिकदृष्टया शांती लागेल .
कुंभ :-
पैशाचे व्यवहार तसेच जमीन- जुमला अशा व्यवहारांमध्ये कोणाला जामीन राहू नका असे श्रीगणेश सुचवितात . मानसिक एकाग्रता राहील . खर्चाचे प्रमाण वाढेल . तब्बेतीकडे लक्ष द्या . अयोग्य जागी गुंतवणूक होणार नाही याची काळजी घ्या . आपल्या निर्णयात स्वकीय सहमत होणार नाहीत . इतरांच्या बाबींत हस्तक्षेप करू नका . त्यामुळे नुकसान होईल . संभ्रमावस्था व अचानक संकट यांपासून दक्ष राहा . रागावर नियंत्रण ठेवा .
मीन :-
श्रीगणेशांच्या मते आज आपण कौटुंबिक आणि सामाजिक गोष्टींत भाग घ्याल . मित्रांच्या भेटी होतील . त्यांच्यासाठी खर्च करावा लागेल . एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल . प्रत्येक क्षेत्रात आपणाला फायदा होईल . विवाहोत्सुकांना योग्य जोडीदार मिळण्याचे योग आहेत .
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा