महाराष्ट्र
सिध्दापुर-बोराळे रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था
सलिम शेख मंगळवेढा ता प्रतिनिधी
मंगळवेढा : सिध्दापुर हे गाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेवटच्या टोकावरील गाव आहे. गावातील शालेय विद्यार्थी, नागरिक ,अबालवृद्ध सर्व दररोज या खराब रस्त्यावरून प्रवास करतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने मोटरसायकल चालकांना या खड्ड्यांमुळे प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. काही नागरिकांना मणक्यांचे आजार होऊ लागले आहेत. सिद्धापुर बोराळे हे ६ किमी अंतर रस्त्यात खड्डा की खड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था या रस्त्याची झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी गावातील प्रत्येक नागरिकातुन होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रकरणी लक्ष देऊन या रस्त्याचा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी काढावेत अशी विनंती नागरिकातुन होत आहे.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा