आजचे राशिभविष्य २३-०६-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य २३-०६-२०२१

आजचे राशिभविष्य २३-०६-२०२१

मेष :-

आज सांसारिक बाबींपासून दूर राहून आध्यात्मिक विषयात मग्न राहाल . त्यामध्ये गहन चिंतनशक्ती आपणाला मदत करेल . गूढ आणि रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील . आध्यात्मिक सिद्धी होण्याचे योग आहेत . तरीही बोलण्यावर संयम ठेवा . त्यामुळेच अनर्थकारी संकटांपासून दूर राहाल . हितशत्रूपासून जपून राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . नवीन कार्यारंभ आज करू नका . अचानक धनलाभ होईल .

वृषभ :-

कुटुंबीयांसमवेत सामाजिक कार्यात किंवा एखाद्या पर्यटन स्थळी प्रवासाला जाण्याचा आनंद लुटाल . व्यापाऱ्यांना व्यापारात वाढ होण्याची शक्यता आहे . सामाजिक क्षेत्रात यश आणि कीर्ती प्राप्त होईल . अचानक धनलाभाची पण आज शक्यता आहे .

मिथुन :-

कार्यपूर्ती आणि यश - कीर्ती प्राप्त होण्याच्या दृष्टीने आजचा दिवस आपणास शुभ आहे असे श्रीगणेश सांगतात . कुटुंबीयांसमवेत आज आनंद , उल्हासपूर्ण वात वरणात सुखात वेळ घालवाल . आर्थिक लाभाची पण आज शक्यता आहे . महत्त्वाच्या विषयांवर खर्च होईल . शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य राहील . तरीही आपण वाणी आणि क्रोध यावर संयम ठेवणे आवश्यक आहे अन्यथा मनाला ठेच लागेल . कामाच्या ठिकाणी सहकारी सहकार्य करतील . त्याच बरोबर मान - सन्मान ही प्राप्त होतील . अपूर्ण कामे तडीस जातील .

कर्क :-

शारीरिक दृष्टया ढिलेपणा आणि मानसिक व्यापयात आजचा दिवस संपे असे श्रीगणेश सांगतात . मित्र आणि संतती विषयक काळजी राहील . अचानक पैसा खर्च करावा लागेल . वादग्रस्त विषय आज टाळा . शक्य असेल तर प्रवासही करू नका . अपचन , अजीर्ण असे विकार त्रास देतील . आज बौद्धिक चर्चेपासून ही दोन हात दूर राहा .

सिंह :-

आज सावध राहण्याचा सल्ला श्रीगणेश देतात . उक्ती आणि कृती यावर संयम ठेवून वादविवादापासून बचाव करावा . आईशी वादविवाद होण्याची शक्यता आहे . मनावर वैचारिक दृष्टीने नकारात्मकतेचा पगडा राहील . स्थायी संपत्तीच्या कागदपत्रावर सही करताना दक्षता बाळगा . पाण्यापासून जपा . तब्बेतीकते आज विशेष लक् द्या .

कन्या :-

शारीरिक उत्साह आणि मानसिक प्रसन्नता यामुळे आज मनाला शांततेचा लाभ मिळेल . कार्यात यश मिळेल . कुटुंबीय आणि मित्रपरिवार यांच्याशी असणारे संबंधात माधुर्य वाढेल . त्यांचे चांगले सहकार्य मिळेल . गूढ आणि आध्यात्मिक विषयात सिद्धी प्राप्त होईल .

तूळ :-

द्विधा मनःस्थितीमुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे जमणार नाही . महत्त्वाच्या कामाची सुरुवात करायला दिवस चांगला नाही . कामात आपल्या आळशीपणामुळे आपणाला दुःख होण्याची शक्यता आहे . व्यवहारात हटवादीपणा सोडल्यामुळे परिणाम सकारात्मक मिळतील . कुटुंबीयांशी वादविवाद टाळा . तब्बेतीकडे लक्ष द्या . आर्थिक लाभ होतील .

वृश्चिक :-

आज शारीरिक आणि मानसिक प्रसन्नता लाभेल . घरात सुखा- समाधानाचे वातावरण राहील . मित्र आणि स्नेही यांच्या भेटीने आनंद होईल . एखाद्या प्रेक्षणीय स्थळी सहलीला जाण्याची शक्यता आहे .

धनु :-

उक्ती आणि कृती यांवर संयम ठेवला नाही तर आपत्ती येण्याची शक्यता आहे . रागावर पण नियंत्रण ठेवा , अन्यथा कोणाशी वादविवाद होतील . मानसिकदृष्ट्या चिंतेत राहाल . अपघातापासून जपा . उत्पन्नापेक्षा खर्च अधिक होईल . कुटुंबीयांशी मतभेद होतील . तब्बेतही बिघडेल . शांतता मिळण्याच्या दृष्टीने ईश्वराची उपासना आणि आध्यात्मिकता उपयोगी पडेल .

मकर :-

श्रीगणेश सांगतात की आजचा दिवस लाभदायक आहे . सगेसोयरे आणि मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल . विवाहोत्सुकांना इच्छित साथीदार लाभल्याने आनंद वाटेल . व्यापारातही दिवस लाभदायी ठरेल . सहली प्रवास होतील . मित्रांकडून भेटवस्तू मिळतील . नव्या वस्तू खरेदी करण्यासाठी खर्च होईल .

कुंभ :-

आज शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली राहील . व्यवसायात तुमच्या कामाचे कौतुक होईल . त्यामुळे आनंद होईल . कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे चांगले सहकार्य मिळेल . समाजात मान - सन्मान प्राप्त होतील . मित्र आणि कुटुंबीयांसमवेत आनंददायी प्रवास कराल . आज दिवसभर कामे सहजपणे यशस्वी होत असल्याचा अनुभव येईल . त्या कामातून लाभ होईल .

मीन :-

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी असलेले संबंध दुरावणार नाहीत याकडे लक्ष देण्याचा श्रीगणेश सल्ला देतात . शारीरिक कंटाळा आणि मानसिक चिंता राहील . शक्यतो प्रतिस्पर्थ्यांशी वादविवाद टा वैचारिक पातळीवर नकारात्मकता काढून टाका आणि मानसिकदृष्ट्या स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा . हा प्रवास यशस्वी होईल . व्यापारीबंधूंना व्यापारत अडचणी येण्याची शक्यता आहे .
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads