राज्याच्या ‘या’ भागात येत्या ४ दिवसांत मुसळधार पाऊस; हवामानात मोठे बदल - दैनिक शिवस्वराज्य

राज्याच्या ‘या’ भागात येत्या ४ दिवसांत मुसळधार पाऊस; हवामानात मोठे बदल



समीर शेख द.सोलापूर ता.प्रतिनिधि

दि.११ जुन : राज्याच्या अनेक भागांत मॉन्सून दाखल झाल्याने कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. सोमवारपर्यंत संपूर्ण कोकण व पूर्वविदर्भात मुसळधार पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहून तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसण्याचा इशारा हवामान विभागाने दिला.

सध्या मॉन्सून उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने सरकत आहे. त्यामुळे वातावरणात चांगलेच बदल होत आहे. कोकणात दोन दिवसांपासून चांगलाच पाऊस कोसळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत अधूनमधून ऊन पडत आहे. त्यामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानात चांगलीच घट झाली आहे. गुरुवारी (ता.१०) सकाळच्या आठ वाजेपर्यंत विदर्भातील वाशीम येथे ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्र, कोकणात पाऊस पडत असल्याने हवेत गारवा वाढल्याने कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. कोकण विभागात तापमानात मोठी घसरण झाली आहे. या भागात कमाल तापमान २६ ते २९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.
दरम्यान, मध्य महाराष्ट्रात तापमान चांगलीच घट झाली असून, महाबळेश्‍वर येथे सर्वांत १८.७ अंश सेल्सिअसचे सर्वांत कमी कमाल तापमान नोंदविले गेले. या भागात १८ ते ३३, मराठवाड्यात ३३ ते ३५, तर विदर्भात ३३ ते ३६ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान नोंदविले गेले.

या जिल्ह्यांमध्ये होणार पाऊस
शुक्रवार – संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ
शनिवार – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ
रविवार – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ
सोमवार – कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads