चंदगड विधानसभा मतदार संघामधे राष्ट्रवादी पक्षांतर्गत चार नव्या नियुक्त्या - दैनिक शिवस्वराज्य

चंदगड विधानसभा मतदार संघामधे राष्ट्रवादी पक्षांतर्गत चार नव्या नियुक्त्या




गडहिंग्लज तालुका प्रतिनिधी आप्पासाहेब गोईलकर


कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय प्रतिनिधीत्वामधे 271-चंदगड विधानसभा मतदार संघाचा आजवर नेहमीच मोलाचा वाटा आहे.
आगामी निवडणूकीसाठी मोर्चेबांधनीला सुरूवात म्हणून  कर्तबगार व परिणामकारक अश्या उमेदवारांची नेमणूक होताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर दिनांक २६/०६/२०२१ रोजी आमदार श्री. राजेश नरसिंगराव पाटील यांच्याद्वारे चंदगड व गडहिंग्लज तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षांतर्गत मतदार संघातील चार कर्तव्यदक्ष उमेदवारांची निवड केली आहे. नियुक्त उमेदवारांचा सामाजिक कार्यातील सहभाग पाहुन त्यांची निवड करण्यात आली आहे.
     
त्यांच्याकडून पक्षांतर्गत नियुक्तीकरता अल्पसंख्याक  गटातील चार प्रतिष्ठित उमेदवारांची नावे माननिय श्री. ए. वाय. पाटील सो. राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष, कोल्हापूर यांच्याकडे करण्यात आली आहेत
 श्री. बशीर हसन अहमद पठाण (मुक्काम पोस्ट - महागाव, तालुका - गडहिंग्लज) यांची चंदगड विधानसभा अध्यक्ष, श्री. रजाक मोहम्मद हनीफ सनधी (मुक्काम पोस्ट - तळगुडी , तालुका- चंदगड) यांची चंदगड तालुका अध्यक्ष, श्री. सादिक काशी मुल्ला (मुक्काम पोस्ट - चंदगड  , तालुका- चंदगड) यांची चंदगड नगर अध्यक्ष आणि श्री. मोहम्मदरफिक अब्दुल नाईकवाडी (मुक्काम पोस्ट - गडहिंग्लज, तालुका - गडहिंग्लज) यांची गडहिंग्लज तालुका अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.

  सदर नियुक्ती करण्यात आली त्यामुळे स्थानिकांच्या बोलण्यानूसार नियुक्त उमेदवारांची निवड योग्य व त्यांनी केलेल्या कार्याला अनुसरून आहे असे म्हटले जात आहे.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads