टॉप जीनोम सिक्वेंसर म्हणाले - कोरोनाचा हा स्ट्रेन चिंताजनक, पण यामुळे तिसऱ्या लाटेचा पुरावा नाही - दैनिक शिवस्वराज्य

टॉप जीनोम सिक्वेंसर म्हणाले - कोरोनाचा हा स्ट्रेन चिंताजनक, पण यामुळे तिसऱ्या लाटेचा पुरावा नाही



प्रतिनिधी :रविना यादव.

डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात होती. यामुळे संपूर्ण जगात चिंताजनक वातावरण निर्माण झाले होते. परंतु, या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे कोरोनाची तिसरी लाट येईल याचा अद्याप कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे टॉप जीनोम सिक्वेंसर यांनी सांगितले आहे. तथापि, कोरोनाचा हा नवा स्ट्रेन चिंताजनक असल्याचेही ते म्हणाले.

द इन्स्टिट्यूट ऑफ जीनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बॉयोलॉजीचे (IGIB) संचालक अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अजून संपलेली नाही याची आपल्याला काळजी वाटायला पाहिजे. देशातील काही भागात डेल्टा प्ल्स व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहे. यामुळे संपूर्ण देशात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु, या भीतीला देशातील टॉप डॉक्टर्स आणि जीनोम सिक्वेंसर यांनी निराधार असल्याचे म्हटले आहे. याचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी काहीही नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.
 
डेल्टा प्लसविषयी 4 महत्त्वाचे पॉइंट्स

डेल्टा प्लसचे प्रकरणे 1% कमी
हिंदी वृत्तवाहिनी एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, डॉ. अग्रवाल म्हणाले की डेल्टा प्लसचा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी काहीही संबंध नाही. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी लढताना आपला सावधपणा कमी होणार नाही याची काळली घ्यायला हवी असेही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, संस्थेतर्फे जून महिन्यात महाराष्ट्रात 3 हजारांपेक्षा जास्त नमुने घेण्यात आले. जे नमुने एप्रिल व मे महिन्यातील होते. या नमुन्यात डेल्टा प्लस व्हेरिएंट आढळले असून ते 1 टक्क्यांपेक्षाही कमी होते. जेथे कोरोनाचे जास्त प्रकरणे आढळत होते तेथेदेखील याचे प्रमाण जास्त नसल्याचे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.



डेल्टा व्हेरिएंटचे सर्वस्ट्रेनला व्हेरिएंट ऑफ कंसर्न मानले जाईल. डेल्टा प्लविषयी सर्वात पहिले पब्लिक हेल्थ इंग्लंडमध्ये 11 जूनला एक रिपोर्ट देण्यात आला होता.
भारतात 45 हजारांपेक्षा जास्त सँपलची सीक्वेंसिंग झाली, ज्यामध्ये डेल्टा प्लसविषयी 40 प्रकरणे समोर आली. दरम्यान यामध्ये खूप जास्त वाढ दिसत नाही.
डेल्टा प्लसचे भारतात पहिले प्रकरण 5 एप्रिलला महाराष्ट्रात घेतलेल्या एका नमुन्यात आढळले होते.
जगभरात डेल्टा प्लसचे 205 प्रकरणे आढळले आहेत, ज्यामधून अर्ध्यापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका आणि ब्रिटेनमध्ये आहेत.

केंद्र सरकारची एडवायजरी

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार डेल्टा प्लस व्हेरियंटला कसे सामोरे जावे यासंबंधी माहिती देण्यासाठी राज्यांना पत्र लिहिले गेले आहे. भारतीय SARS-CoV-2जीनोमिक कन्सोर्टियाच्या नुकत्याच झालेल्या निष्कर्षांच्या आधारे महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार या प्रकाराला सामोरे जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये याची प्रकरणे समोर आली आहेत, त्या ठिकाणी कंटेनमेंटचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

 इतर राज्यातही रुग्ण आढळण्याची शक्यता

काही मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, हा स्ट्रेन या 3 राज्यांव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये आढळला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात या व्हेरिएंटची सर्वाधिक 21 प्रकरणे नोंदवण्यात आली असून मध्य प्रदेशात 6 प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त केरळ, तामिळनाडू, कर्नाटकमधील 2 आणि पंजाब, आंध्र प्रदेश आणि जम्मूमध्ये प्रत्येकी एक प्रकरणात हे व्हेरिएंट आढळले आहे.

 व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट प्रकारात डेल्टा प्लस

निती आयोगाचे सदस्य डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, डेल्टा प्रकार जगातील 80 देशांमध्ये आहे. हा प्रकार भारतातील दुसरी लाट वाढवण्यास कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. याला व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या श्रेणीमध्ये ठेवण्यात आले आहे. डेल्टा प्लस प्रकार सध्या ब्रिटन, अमेरिका, जपान, रशिया, भारत, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या 9 देशांमध्ये आढळला आहे. हे सध्या व्हेरिएंट ऑफ कंसर्नच्या श्रेणीत आहे.

 डेल्टा प्लस व्हेरिएंट पसरावा असे वाटत नाही - डॉ. पॉल

तिसरी लाट येण्याच्या प्रश्नावर डॉ. पॉल म्हणाले की, व्हायरस कधी आपले रुप बदलेल याविषयी कोणीच सांगू शकत नाही. याचा आधीच अंदाज लावला जाऊ शकत नाही. परंतु जगात असे बरेच देश आहेत येधे दुसरी लहर किंवा चौथी लहर आली नाही . म्हणजेच, जर आपण सावधगिरी बाळगली तर कदाचित ही लाट नियंत्रणात राहू शकेल. दरम्यान दिलासा देणारी बाब आहे की 7 मेच्या तुलनेत देशात कोरोना प्रकरणात 90% घट झाली आहे.
अमेरिकन कंपनी मॉडर्ना यांनी भारतात कोरोना लस पुरवल्याच्या प्रश्नावर पॉल म्हणाले की कंपनीच्या मागण्यांबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. यावर चर्चा सुरूच आहे. मोडेर्नाने भारतात लस पुरवण्याच्या संदर्भात काही अटी लादल्या आहेत.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads