वाघोलीवाडी येथे माझे बालक माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत वय वर्ष 0 ते18 वर्षा पर्यंतच्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी - दैनिक शिवस्वराज्य

वाघोलीवाडी येथे माझे बालक माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत वय वर्ष 0 ते18 वर्षा पर्यंतच्या सर्व बालकांची आरोग्य तपासणी


समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-

मोहोळ  (वाघोली) :  वाघोलीवाडी येथे गुरुवार दिनांक १ जुलै रोजी माझे बालक माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत वय वर्ष 0 ते18 वर्षा पर्यंत च्या सर्व बालकांचे प्राथमिक आरोग्य केंद्र बेगमपूर यांच्या व ग्रामपंचायत कार्यालय वाघोली वाघोलीवाडी ज्यांच्या विद्यमानाने या ठिकाणी मोफत गावातील बालकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली.
सर्व प्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन गावचे सरपंच नेताजी भैय्या वाघमारे व बेगमपुर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश शिवशरण यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
सविस्तर माहिती अशी कोरोना संसर्गाच्या वाढता प्रादुर्भाव व येणाऱ्या तिसऱ्याला लाहेटीची खबरदारी म्हणून गावातील सर्व बालकांचे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली वाडी याठिकाणी गावचे माजी सरपंच तसेच उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे यांच्या व बेगमपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश शिवशरण यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आरोग्य तपासणी करण्यात आली.
या तपासणी दरम्याने गावचे माजी सरपंच उद्योगपती रामचंद्र दादा पतंगे यांच्यासह गावचे कर्तव्यदक्ष सरपंच नेताजी भैय्या वाघमारे, ग्रामपंचायत सदस्य विकास वाघमारे, नितीन पाटील, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टर किशोरी कारंडे मॅडम, सोहाळे उपकेंद्राच्या आरोग्यसेविका डॉ.शोभा सरगुले मॅडम, आरोग्य सेवक रवीकिरण माने, आरोग्य सेवक दत्तात्रय लोणारी, आरोग्य सेविका ज्योती एस कुंभार, गावातील अंगणवाडी सेविका शीला गोडबोले, महादेवी चंदनशिवे, गावातील अशावर्कर मनीषा वाघमारे, राधा गायकवाड, शाळेचे मुख्याध्यापक अश्विनी सांगवे मॅडम, शिक्षक भालचंद्र घोडके, महावितरण कंपनीचे कर्मचारी सचिन लांडे, नागनाथ दसाडे, रामभाऊ पतंगराव तसेच ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी वृंद
यांच्यासह गावातील निस्वार्थी सेवा करणारे पावन गणपती प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व वाघोली वाडी येथील बालक व पालक हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads