राजकीय
केंद्र सरकारच्या पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जामनेमध्ये आंदोलन...!
जामनेर तालुका प्रतिनिधी नितीन इंगळे :-
सरकारने पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅस दरवाढ करून ज्याप्रमाणे सामान्य जनतेला लुटण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे तो पाहून कधीकाळी 75-80 रुपये लिटरच्या दरम्यान असणारं पेट्रोलचे दर कमी करून 40 रुपयांपर्यंत कमी करू म्हणणारे मोदी त्यावेळी किती फेकफेकी करत होते असा आरोप काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी जामनेर येथे नगर परिषद समोर केला आहे जगभरात स्वतःला विश्वगुरू म्हणून प्रोजेक्ट करणारे मोदी आपल्याच देशातील जनतेला आर्थिक स्थैर्य देऊ शकत नाहीत. सामान्य जनतेला दैनंदिन जीवनात आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे दर स्थिर ठेवू शकत नाहीत. अशी व्यक्ती कुठल्या तोंडाने स्वतःला विश्वगुरू म्हणवून घेतो हाच अजब प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. एकीकडे कोरोनाच्या दोन-दोन लाटा आल्यात, त्यामुळे लाखो लोक मेलेत, असंख्य लोक कोरोनामुळे बेजार झालेत. कोरोना नियंत्रित यावा म्हणून केंद्र सरकारने लॉकडाउन जाहीर केला, तर हातावर पोट असणारी बहुतांश जनता कित्येक दिवस रोजगार नसल्याने अक्षरशः भिकेला लागलेली आपण पाहतोय. अशा परिस्थितीत कोरोनातून वाचलो, आणि महागाईने मेलो. अशी गत आज देशवासियांची झालेली आहे.
महागाईच्या भडक्यामुळे केंद्र सरकार अयशस्वी झाल्याचं चित्र स्पष्ट आहे. तरीही सरकार महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कुठलेही प्रयत्न करताना दिसत नाहीये. यामुळेच मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज प्रदेशाध्यक्ष मा. Jayant Patil - जयंत पाटील यांच्या आदेशानुसार राज्यभरात निषेध आंदोलन करण्यात आलेत. म्हणून या पार्श्वभूमीवर जामनेरातही जिल्हाध्यक्ष मा. Adv. Ravindra Bhaiyasaheb Patil यांच्या व तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मा. Sanjaydada Garud FC तसेच महिला जिल्हाध्यक्षा सौ.वंदनाताई चौधरी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारविरोधात निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं.
यावेळी आंदोलनाला मा.अशोक चौधरी, राष्ट्रवादी सामाजिक न्यायचे जिल्हाध्यक्ष मा.अरविंद मानकरी, तालुकाध्यक्ष मा.राजेंद्र पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.किशोर पाटील, शहराध्यक्ष मा.जितेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष मा.विलास राजपूत, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मा.डॉ.प्रशांत पाटील, तालुका युवक अध्यक्ष मा.शैलेश पाटील, पदवीधर सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष मा.डॉ.बाजीराव पाटील, तालुका उपाध्यक्ष मा.प्रल्हाद बोरसे, सामाजिक न्याय तालुकाध्यक्ष मा.संदीप हिवाळे, अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष मा.राजू जंटलमन, तसेच अनेक पदाधिकारी महिला पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या उपस्थित होते.
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा