राजकीय
भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ परभणीत आंदोलन
प्रतिनिधी / बालाजी गोरे :-
महाविकास आघाडी सरकारने भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन केल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या महानगर जिल्हा शाखेने मंगळवारी( ता.6) परभणी जोरदार निदर्शने केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, नगरसेविका सौ. मंगला मुदगलकर राज्य कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी,दिनेश नरवाडकर,सुरेश भुमरे समीर दुधगावकर, अनुप शिरडकर,नगरसेवक मधूकर गव्हाणे,विजय गायकवाड, सुप्रिया कुलकर्णी, यांच्यासह अन्य संतप्त कार्यकर्त्यांनी
महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलन करते व पोलिसांत झटापट सुद्धा झाली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा