आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गतमहिला बचत गटांना योजनांची माहिती, नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रा.जि.म.बँक पाली शाखेचा स्तुत्य उपक्रम - दैनिक शिवस्वराज्य

आर्थिक आणि डिजिटल साक्षरता अभियान अंतर्गतमहिला बचत गटांना योजनांची माहिती, नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रा.जि.म.बँक पाली शाखेचा स्तुत्य उपक्रम



सुधागड /कोंडगाव. (विशेष प्रतिनिधी) राम तुपे

 सुधागड पाली 
ग्रामीण क्षेत्राचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेला वित्तपुरवठा करणारी नाबार्ड ही एकमेव शिखर संस्था आहे. शेती व ग्रामीण पतपुरवठ्यासंबंधीची जी कामे रिजर्व बँक करीत असे ती सर्व कामे नाबार्डकडे सोपविण्यात आली. नाबार्ड स्थापना दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाली शाखेने नाबार्ड च्या विविध योजनांची माहिती महिला बचत गटांना व्हावी व त्यातून विकास साधावा या हेतूने या उपक्रमाचे आयोजन तालुक्यात पाली व आपटवणे येथे केले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या. यावेळी पाली शाखेचे शाखाधिकारी डी.के.देशमुख, शाखा निरीक्षक एन.एन.नागे तसेच कर्मचारी सुधीर साखरले व प्रशांत जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
सुधागड तालुक्यात रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाबार्ड ने स्थापन केलेल्या महिला बचत माध्यमातून उत्तम प्रकारे कार्यरत आहेत. यावेळी बोलतांना शाखाधिकारी डी.के.देशमुख म्हणाले कि मागील दोन वर्षाच्या काळात वादळ वारा अशी नैसर्गिक आपत्ती आणि कोरोना महामारीच्या मोठ्या संकटाला हार न मानता सामोरे गेलो तसेच यापुढेही घाबरून न जाता हार मानायची नाही असा धीर यावेळी महिला बचत गटातील महिलांना दिला. बँकेच्या होम सेविंग, रिकरिंग, ठेव योजना, कर्ज योजना आदींची माहिती यावेळी देण्यात आली. एफ एल सी अंतर्गत बचत गट कार्यक्रमांतर्गत होम सेविंग ची एकवीस, सेविंग ची दहा, रिकरिंग ची पाच खाती अशी छत्तीस खाती नव्याने उघडण्यात आली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads