महाराष्ट्र
जिल्हा परिषद सोलापूर यांच्याकडून शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर दूध काढणी यंत्र मिळणार : अनील मोटे
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-
सोलापूर . जिल्हा परिषद कृषी विभागातर्फे सोलापूर जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना जनावरांचे दूध काढण्यासाठी वापरले जाणारे यंत्र 50 टक्के अनुदानावर देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद पशुसंवर्धन व कृषी सभापती मा. अनिल मोटे यांनी दिली.
जिल्हा परिषद कृषी समितीच्या बैठकीत कृषी विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यासाठी साडेतीन कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे यातील बहुतांश निधी जिल्ह्यातील जनावरांच्या लसीकरणावर व वैरणीच्या बियाणे यांच्यासाठी वापरला जातो त्यामुळे गेल्यावर्षी कोरोना महामारी ने कृषी विभागाच्या योजना राबवता आले नाहीत त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना वैयक्तिक योजनांचा लाभ देण्यात येणार आहे अशी माहिती सभापतींनी दिली
ग्रामीण भागात पशुपालकांची संख्या वाढल्याने जनावराचे दूध काढण्यासाठी 28 हजाराचे साहित्य खरेदी चे नियोजन आहे. म्हणजेच 14 हजार रुपये अनुदान जिल्हा परिषद देणार आहे यापेक्षा अधिक किंमत यंत्राची असेल तर फरकाची रक्कम लाभार्थ्यांने द्यायची आहे.
तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना 20 ते 30 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर व अवजारे घेण्यासाठी अनुदान असल्याची माहिती सभापतींनी दिली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा