आजचे राशिभविष्य ०८-०७-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य ०८-०७-२०२१

आजचे राशिभविष्य ०८-०७-२०२१

मेष :-

द्विधा मनःस्थितित दिवसाची सुरुवात होईल . इतरांशी वादग्रस्त व्यवहार सोडून समाधानकारक व्यवहार स्वीकाराल . आपण आपल्या मधुर वाणीने इतरांवर छाप पाडाल . गणेशजींचा सल्ला आहे की नवीन कार्याचा प्रारंभ करू नका . दुपारनंतर उत्साह वाढेल आणि मन आनंदी राहील . कुटुंबीयांशी सुसंवाद साधाल . सहलीचे बेत आखाल . आर्थिक बाबींचे नियोजन कराल .

वृषभ :-

आपला आजचा दिवस मध्यमफलदायी राहील , असे गणेशजींचे सांगणे आहे . दिवसाच्या प्रारंभी मानसिक आणि शारीरिक स्फूर्ती आणि आनंद मिळेल . सृजनशील आणि कलात्मक कत वाढेल . अधिक उत्साहाने कार्य कराल . दुपारनंतर द्विधा मनःस्थि राहील . त्यामुळे विचारात गढून जाल . महत्वाचे निर्णय घेऊ नका असा गणेशजींचा सल्ला आहे .

मिथुन :-

श्रीगणेशजी सांगतात की आजचा आपला दिवस संमिश्र फलदायी जाईल . मन चिंताग्रस्त राहील आणि तब्बेतही ठीक राहणार नाही . कुटुंबीयांशी मतभेद होतील . नंतर मात्र सर्व कामांस अनुकूलता लाभेल . कामात उत्साह वाढेल घरातील वातावरण निवळेल . आर्थिक लाभाची शक्यता .

कर्क :-

आज सकाळच्या वेळी घरगुती आणि व्यावसायिक क्षेत्रांत लाभदायी . स्त्री वर्गाकडून लाभ होण्याचे योग . प्रिय व्यक्तीची भेट होईल . मानसिक व शारीरिक स्वास्थ्य चांगले राहील . दुपारनंतर मनात काळजीचे काहूर माजेल . त्यामुळे कौटुंबिक वातावरण बिघडेल हा . ती घेतलेली कामे अपूर्ण राहतील खर्चाचे प्रमाण वाढेल . तब्बेतीकडे लक्ष देण्याची श्री गणेशजींकडून सूचना आहे .

सिंह :-

आजचा दिवस खूप आनंदात जाईल असे गणेशजी सांगतात व्यापार धंदा करणार्यान्साठी आजच्या दिवशी लाभदायक व्यापार वाढेल . मित्र आणि परिवारासोबत आनंदात वेळ जाईल . स्त्री वर्गाकडून लाभाची शक्यता संततीकडून ही लाभ प्राप्ती . छोटे प्रवास होतील . वैवाहिक सुख मिळेल .

कन्या :-

श्रीगणेशजी सांगतात की नवे कार्य हाती घ्यायला अनुकूल वेळ आहे . धार्मिकतेकडे वळाल . नोकरी- व्यवसायात कामाचा ताण वाढेल . परदेशगमनाच्या संधी ब्ध होतील . रनंतर नवीन कार्याचे नियोजन कराल . अपूर्ण कार्य पूर्ण होण्याच्या दृष्टीने वाटचाल कराल . व्यवसाय वाढेल . प्रापंचिक जीवनात माधुर्य वाढेल . मान- प्रतिष्ठा मिळेल .

तूळ :-

आज खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष देण्याची सूचना गणेशजी देतात . नव्या कार्यारंभास दिवस प्रतिकूल . कामाचा ताण राहील व मानसिक तणाव वाढेल . प्रवास फायदेशीर ठर नाही . दुपारनंतर मात्र कार्यास गती मिळेल . धार्मिक कार्ये होतील . परदेशातील स्वकीयाकडून वार्ता मिळतील . व्यापारात धनलाभ होईल . नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल ग्रहमान राहील .

वृश्चिक :-

श्रीगणेशजींच्या कृपेने दांपत्यजीवन सुखकारक असे आणि वैवाहिक सुखाचा आनंद अनुभवाल . आप्तांसह सामाजिक ( सार्वजनिक ) समारंभात सहभागी व्हाल . जवळ्चे प्रवास होतील . दुपारनंतर तब्बेत बिघडू शकेल . मानसिक अस्वास्थ्य अनुभवाल . दुपारनंतर नवीन कार्य हाती घेऊ नका . प्रवासात विघ्ने येतील . खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्या योग व ध्यान या मुळे मानसिक शांतता लाभेल .

धनु :-

आजचा दिवस शुभफलदायी आहे , असे गणेशजी सांगतात . शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य असले , तरीही तुम्ही अपूर्ण कामे पूर्ण कराल . आर्थिक नियोजन चांगले कराल . नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांचे सहकार्य चान्गले मिळेल . आप्तेष्टांशी जवळीक वाढेल . वैवाहिक जीवनात आनंद मिळेल . सामाजिक कार्यात यश मिळेल . व्यापारीवर्गाला व्यवसायात वृद्धि मिळेल .

मकर :-

वैचारिक स्तरावर आपल्या मधुर वाणीने आपण इतरांवर प्रभाव पाडाल असे गणेशजी सांगतात मधुरवाणीमुळे नवीन संबंध जोडाल . आर्थिक नियोजन चांगले कराल . पूर्ण दिवस आनंदात जाईल . नोकरीत इतरांचे सहकार्य मिळेल . दुपारनंतर आजारी व्यक्तींची तब्बेत सुधारेल . कामे पूर्ण होतील .

कुंभ :-

आज आपण प्रत्येक काम आत्मविश्वासाने , व्यवस्थीत पार पाडाल असे गणेशजी सांगतात . सरकारी आर्थिक कामांत यश मिळेल . वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होईल . वाहन इत्यादी संबंधित काळजीपूर्वक वाटचाल करा . वैचारिक समृद्धी वाढेल . मन आनंदी राहील . कष्टाच्या मानाने प्राप्ती कमी होईल . तरीही काम व्यवस्थीत पूर्ण केल्याचा आनंद मिळेल . तब्बेतीकडे लक्ष द्या .

मीन :-

आपल्या चिंता कमी झाल्याचा अनुभव येईल असे गणेशजी सांगतात . आनंद आणि उत्साह वाढेल . कौटुंबिक आणि आर्थिक बाबींकडे अधिक लक्ष द्याल . एखादे कार्य खंबीर मन आणि आत्मविश्वासाने पूर्ण कराल . वडील घराण्याकडून लाभ होण्याची शक्यता . पण जमीन , मिळकत इ . विषयी सावध राहा . संततीसाढी खर्च करावा लागेल . विद्यार्थी वर्ग शिक्षणक्षेत्रात चमकतील .

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads