महाराष्ट्र
मा. राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून ड्रेनेज लाईन व रस्त्याचे कामाचे भूमिपूजन
समीर शेख सोलापूर जिल्हा प्रतिनिधी :-
सोलापूर : प्रभाग 26 मधील रोहिणी नगर भाग 3 मध्ये श्री मनीष भैया देशमुख यांच्या सूचनेनुसार ड्रेनेज लाईन टाकने
व रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करण्यास टाकने. या कामासाठी उपमहापौर राजेश काळे यांच्या भांडवली निधीमधून पाच लाख रुपये खर्च करून ड्रेनेज लाईन व रस्ता करणे कामासाठी देण्यात आले त्या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपमहापौर राजेश काळे, माजी परिवहन सभापती श्री दैदीपय्य वडापूरकर, अनुप बेंजरपे, प्रशांत थोरात, संतोष व्हांनकोरे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा चिटणीस संपदा जोशी, सौ खारे मॅडम, सौ ठीपे मॅडम, प्रमोद राजे ठाकरे, श्री कुलकर्णी सर, कोरे सर, श्री बिराजदार, श्री जाधव सर, राठोड सर, व तेथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते गेल्या तीस वर्षापासून रोहिणी नगर भागां मध्ये ड्रेनेज लाईनची समस्या आहे ती सोडविण्यासाठी तेथील नागरिकांनी भारतीय जनता पार्टीचे युवा नेतृत्व श्री मनीष भैया देशमुख यांना पत्र दिले होते त्यांच्या सूचनेनुसार तिथे कामाची सुरुवात करण्यात आली.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा