केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलेंडर व इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पालीत जोरदार निदर्शने - दैनिक शिवस्वराज्य

केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलेंडर व इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पालीत जोरदार निदर्शने


सुधागड / कोंडगाव (विशेष प्रतिनिधी ) राम तुपे

सुधागड पाली केंद्र सरकारने केलेल्या गॅस सिलेंडर व इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पालीतील शिवाजी स्मारकासमोर शनिवारी (ता.3) जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेधाचे फलक दाखविण्यात आले. यावेळी गॅस सिलेंडर व इंधनाचे ड्रम प्रतिकात्मकरित्या ठेवण्यात आले होते.
    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष सुरेश लाड यांच्या मार्गदर्शनाखाली व महिला जिल्हाध्यक्षा गीता पालरेचा यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. 
   यावेळी गीता पालरेचा, तालुका अध्यक्ष रमेश साळुंखे, तालुका महिला अध्यक्षा रुपाली भणगे, तालुका युवक अध्यक्ष संदेश शेवाळे, पाली शहर अध्यक्ष अभिजित चांदोरकर, शहर युवक अध्यक्ष किरण मढवी, इम्तियाज पठाण, किरण खंडागळे, सुलतान बेनसेकर, सुशील शिंदे, सखाराम दिघे, राजेश बेलोसे, परेश वडके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads