महाराष्ट्र
गोंदवले बुद्रुक सातारा लॉकडाऊन केल्यामुळे भाविक नाराज
प्रशांत आडसर बदलापूर प्रतिनिधी :-
कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही ओसरलेला नसल्याने प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी गोंदवल्यात आज लॉकडाऊन केल्याने गुरुपौर्णिमेदिवशी समाधी मंदिर परिसरात सन्नाटा होता.
गोंदवले बुद्रुक मधील श्री ब्रह्मचैतन्य महाराज समाधी मंदिरात दर पौर्णिमेला भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी होत असते.गुरुपौर्णिमेदीवशी तर येथे मोठी यात्राच भारत असते.परंतु कोरोनामुळे गेल्या वर्षांपासून मंदिरे बंद असल्याने येथी पौर्णिमेचा उत्सव बंदच आहे.आज गुरुपौर्णिमा असल्याने भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने संपूर्ण गावच प्रतिबंधित म्हणून जाहीर केले होते.समाधी मंदिर परिसरासह गावातील अत्यावश्यक सेवेसह सर्वच दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार बाई माने यांनी दिले होते.त्यामुळे आज गुरुपौर्णिमा असून देखील सकाळपासून सगळीकडे शुकशुकाट होता.
समाधी मंदिरात नेहमीप्रमाणे विविध धार्मिक कार्यक्रम काही मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडले.समाधी मंदिर समितीच्या विश्वास्थांच्या हस्ते श्रींच्या पादुका व समाधीचे विधिपूर्वक पूजन करण्यात आले.
दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी सकाळपासूनच मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता.त्यामुळे नेहमी गजबज असलेल्या या परिसरात आज शांतता दिसत होती.समाधी मंदिर बंद असले तरी काही भाविकांनी प्रवेशद्वारातूनच दर्शन घेतले.
दरम्यान समाधी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईट वरून आज दिवसभर श्री महाराजांच्या समाधीचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते.त्यामुळे असंख्य भाविकांनी घरी थांबूनच श्रींच्या समाधी दर्शनाचा लाभ घेतला.
Previous article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा