महाराष्ट्र
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त गोणेवाडी येथे छत्री वाटप कार्यक्रम संपन्न
सलीम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-
मंगळवेढा तालुक्यातील गोणेवाडी येथे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे युवा नेते रामेश्वर मासाळ यांच्यावतीने गोणेवाडी ग्रामस्थांना छत्री वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. तसेच या कार्यक्रमास रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा,भारत बेंद्रे,तानाजी काकडे,बसवराज पाटील, अरुण किल्लेदार, चंद्रशेखर कोंडूभैरी, संगीता कट्टे, सुरेश कट्टे सर,रामेश्वर मासाळ ,संभाजी गावकरे,अर्जुन मासाळ व गावातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा