आजचे राशिभविष्य २८-०७-२०२१ - दैनिक शिवस्वराज्य

आजचे राशिभविष्य २८-०७-२०२१

आजचे राशिभविष्य २८-०७-२०२१

मेष :-

अत्यंत सावधपणे आजचा दिवस घालवा असा सल्ला श्रीगणेश देतात . सर्दी , खोकला आणि ताप यामुळे तब्बेत बिघडेल . स्वकीयांचा वियोग होईल . दानधर्म करण्यात धनाची लूट होण्याची परिस्थिती निर्माण होईल . सबब सांभाळून राहा . मानसिक बेचैनी राहील . धार्मिक आणि सामाजिक कार्यावर पैसा खर्च करावा लागेल . अयोग्य ठिकाणी पैशाची गुंतवणूक होणार नाही . याकडे लक्ष द्यावे .

वृषभ :-

आज आपणावर श्रीगणेशाची पूर्ण कृपा राहील . परिवारात सुख आणि शांती राहील . कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदात वेळ घालवाल . उत्पन्नात आणि धंद्यात वाढ होईल . रम्य स्थळी पर्यटनाला जाण्याचा बेत आखाल . स्त्री वर्गाकडून लाभ होईल . त्यांच्याकडून आदर मिळेल . व्यापारात ओळख आणि संपर्क यांमुळे लाभ होईल . मुलगा , पत्नी यांच्याकडून शुभ वार्ता मिळतील . दांपत्यसुख उत्तम मिळेल .

मिथुन :-

श्रीगणेश कृपेने आज शारीरिक , मानसिक सुख चांगले मिळेल . नोकरी व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल . व्यापारी कामाची कदर करतील . त्यामुळे तुम्हाला जास्त प्रोत्साहन मिळेल . बढतीचा योग आहे . समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल . सरकारी कामात यश मिळेल . गृहस्थ जीवनात आनंद मिळेल .

कर्क :-

आज आपण धर्म , ध्यान , देवदर्शन यात जास्त वेळ घालवाल असे श्रीगणेश सांगतात . तीर्थक्षेत्री जाण्याचा योग येईल . शारीरिक व मानसिकदृष्टया हाल . भाग्योदयाची संधी मिळेल . घरात भावंडांबरोबर आनंदात वेळ घालवाल . विदेश यात्रेसंबंधी अनुकूल योग येतील . नोकरदारांना लाभ होईल .

सिंह :-

श्रीगणेशांच्या सांगण्यानुसार आजचा दिवस प्रतिकूलतांचा आहे . तब्बेतीकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल . बाहेरचे खाणे - पिणे टाळा . आजारामुळे खर्च करावा लागेल . नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील . कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा . इष्टदेवतेचे नामस्मरण आणि आध्यात्मिक विचार चिंता कमी करून योग्य मार्गदर्शन करतील .

कन्या :-

श्रीगणेश कृपेने आजचा आपला दिवस अनुकूलतापूर्ण राहील . जीवनसाथी बरोबर जवळीकेच्या क्षणांचा आनंद घ्याल . दांपत्यजीवनात गोडी राहील . भिन्न लिंगीय व्यक्तीचे आकर्षण वाटेल . सामजिक व सार्वजनिक क्षेत्रांत मान- प्रतिष्ठा वाढेल . भागीदारांसमवेतचे संबंध सलोख्याचे राहतील . उत्तम भोजन , वस्त्रालंकार व वाहनप्राप्ती होईल .

तूळ :-

घरात आनंद आणि शांतीचे वातावरण राहील . सुखदायक घटना घडतील . कामात यश आणि सफलता मिळेल . तब्बेत चांगली राहील . आवश्यक कामांवरच खर्च होईल . नोकरीत यश मिळेल . मातुल घराण्याकडून वार्ता येतील . आर्थिक लाभाची शक्यता . सहकारी आणि हाताखालचे नोकर यांचे सहकार्य लाभेल .

वृश्चिक :-

तब्बेती विषयी थोडी तक्रार राहील . संततीची समस्या काळजीत टाकील . मानहानीची शक्यता आहे . शेअर- सट्टायात न पडण्याची सूचना श्रीगणेश देतात . शक्यतो बा , प्रवास यात जपून विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल . आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल .

धनु :-

शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील . मनावर चिंतेचे ओझे राहील . कौटुंबिक वातावरण कलुषित राहील . आईशी मतभेद होईल किंवा तिच्या तब्बेतीसंबंधी चिंता राहील . सार्वजनिक दृष्ट्या आपला मानभंग होऊ नये याकडे लक्ष द्या . वेळेवर जेवण आणि झोप न मिळाल्यामुळे स्वभाव चिडचिडा होईल . महत्वाची खरेदीपत्रे करू नका असा सल्ला श्रीगणेश देतात .

मकर :-

दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्याने दिलासा मिळेल . गृहस्थी जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल . संपत्ती विषयक कामांचा निर्णय होईल . व्यापार - धंद्यात आर्थिक लाभ होईल . भावंडांचे सहकार्य लाभेल . विद्यार्थ्यांसाठी काळ अनुकूल असल्याचे श्रीगणेश सांगतात . प्रिय व्यक्तीची भेट होईल . प्रतिस्पर्ध्यावर मात कराल . नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे .

कुंभ :-

वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल असे श्रीगणेश सांगतात . वाद - विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका . अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा . कामात अल्प यश मिळेल . समाधानाची भावन अनुभवाल . पण तब्बेत बिघडेल . विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील . आर्थिक नुकसानीची शक्यता आहे .

मीन :-

आजचा दिवस आनंद आणि उत्साहाने परिपूर्ण राहील . घरात एखादे मंगल कार्य ठरेल . नवे काम आरंभ करण्यास दिवस चांगला आहे . नातलग , संबंधित आणि मित्र यांच्याशी भेट- संवाद घडतील . त्यांच्या समवेत बाहेर फिरायला वा जेवणासाठी जाण्याची संधी येईल . प्रवास- यात्रेची वाक्यता आहे . तन- मनाने प्रसन्न राहाल . श्रीगणेशाचे आशीर्वाद आपणाला आहेत .

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads