महाराष्ट्र
चिखलमय रस्त्याने घेतला आदिवासी युवकाचा प्राण; अडीच किमी चिखलातुन कधी पाई तर कधी गाडीबैलातून प्रवास
प्रतिनिधी बालाजी गोरे :-
परभणी :- जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या वाघाळा या गावातील अदिवासी पारधी वस्तीवरील एका तीस वर्षीय युवकाला चिखलमय रस्त्यातून उपचारा साठी दवाखाण्यात नेत असतांना झालेल्या उशिरा मुळे प्राण गमवावे लागण्याची घटना सोमवारी २६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली.
या विषयी अधिक माहिती अशी की,वाघाळा गावा पासून दोन अडीच किमी अंतरावर दिडशे ते दोनशे च्या संखेत अदिवासी पारधी समाज शेती कसण्या साठी वसाहत करून मागील अनेक वर्षा पासुन राहातो. पावसाळा सुरू झाला की, या वसाहतीचा गावांशी संपर्क तुटतो याला कारण काळ्या मातीचा चिखलाने माखलेला रस्ता. सोमवारी २६ जुलै रोजी या वसाहतीत राहाणा-या राजेभाऊ रामा पवार वय ३० या युवकाला दुपारी तीन-साडेतीन च्या सुमारास अचानक उलट्या सुरू झाल्या या उलट्या मध्ये रक्त येत असल्याने या वसाहतीत राहाणा-अन्य आदिवासी समाजातील युवकांनी आणि इतरांनी राजेभाऊ या युवकास उचलुन घेत कॅनॉल कडून रस्त्यावर काही अंतर पाई चालत नेल्या नंतर एका मोटार सायकल वर बसऊन नेण्याचा प्रयत्न केला मात्र गेली पंधरा दिवसा पासुन सतत पाऊस असल्याने रस्त्यात गुडघाभर चिखल झालेला असल्याने मोटार सायकल चिखलात रुतून बसली. या नंतर या आजारी युवकाला गाडी बैलातुन दवाखाण्या पर्यंत आण्याचा प्रयत्न सुरू झाला. या वेळी १०८ क्रमांकाला फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची अब्यूलंन्स बोलावली खरी मात्र चिखला मुळे ती ही काही अंतरावर थांबली वसाहत ते अब्यूलंस पर्यंत चा प्रवास कधी पाई तर कधी गाडी बैलात करत या आजारी युवकाला अॅब्युलंन्स पर्यंत आणले आणि तेथून वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वाजता पोहचले. अदिवाशी पारधी समाज वस्ती ते वाघाळा हे दोन अडीच किमी चे अंतर कापण्या साठी तब्बल दिड तास लागला या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी तपासनी केली असता सदरील युवकाला उपचारा साठी आणायला दहा मिनिटे उशिर झाल्याचे सांगुन मृत घोषीत केले. या वेळी येथे उपस्थित सर्वांची मने सुन्न झाली. हा प्रकार केवळ रस्त्या अभावी झाल्याची भावना सर्वांना वेदना देऊन गेली. ही घटना पहिलीच नसुन या पुर्वी ही अनेक वेळा गरोदर महीला,वृद्ध,आजारी व्यक्ती यांना उपचारा साठी नेता न आल्याने मृत्यू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. या विषयी शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी जानिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त करतात. प्रगत म्हणवणा-या महाराष्ट्रा साठी केवळ वेळेवर उपचारा साठी पोहता न आल्याने एका तीस वर्षीय तरुनाला प्राण गमवावे लागले ही लाजिरवानी बाब असल्याची भावना जागृत झाल्या शिवाय राहात नाही.चिखलमय रस्त्याने घेतला आदिवाशी युवकाचा प्राण;अडीच किमी चिखलातुन कधी पाई तर कधी गाडीबैलातून प्रवास;अडीच किमी साठी लागला दिड तास. किरण घुंबरे पाटील परभणी:-जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात असलेल्या वाघाळा या गावातील अदिवाशी पारधी वस्तीवरील एका तीस वर्षीय युवकाला चिखलमय रस्त्यातून उपचारा साठी दवाखाण्यात नेत असतांना झालेल्या उशिरा मुळे प्राण गमवावे लागण्याची घटना सोमवारी २६ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या विषयी अधिक माहिती अशी की,वाघाळा गावा पासून दोन अडीच किमी अंतरावर दिडशे ते दोनशे च्या संखेत अदिवाशी पारधी समाज शेती कसण्या साठी वसाहत करून मागिल अनेक वर्षा पासुन राहातो.पावसाळा सुरू झाला की,या वसाहतीचा गावांशी संपर्क तुटतो याला कारण काळ्या मातीचा चिखलाने माखलेला रस्ता. सोमवारी २६ जुलै रोजी या वसाहतीत राहाणा-या राजेभाऊ रामा पवार वय ३० या युवकाला दुपारी तीन-साडेतीन च्या सुमारास अचानक उलट्या सुरू झाल्या या उलट्या मध्ये रक्त येत असल्याने या वसाहतीत राहाणा-अन्य आदिवासी समाजातील युवकांनी आणि इतरांनी राजेभाऊ या युवकास उचलुन घेत कॅनॉल कडून रस्त्यावर काही अंतर पाई चालत नेल्या नंतर एका मोटार सायकल वर बसऊन नेण्याचा प्रयत्न केला मात्र गेली पंधरा दिवसा पासुन सतत पाऊस असल्याने रस्त्यात गुडघाभर चिखल झालेला असल्याने मोटार सायकल चिखलात रुतून बसली. या नंतर या आजारी युवकाला गाडी बैलातुन दवाखाण्या पर्यंत आण्याचा प्रयत्न सुरू झाला. या वेळी १०८ क्रमांकाला फोन लाऊन प्राथमिक आरोग्य केंद्राची अब्यूलंन्स बोलावली खरी मात्र चिखला मुळे ती ही काही अंतरावर थांबली वसाहत ते अब्यूलंस पर्यंत चा प्रवास कधी पाई तर कधी गाडी बैलात करत या आजारी युवकाला अॅब्युलंन्स पर्यंत आणले आणि तेथून वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाच वाजता पोहचले. अदिवाशी पारधी समाज वस्ती ते वाघाळा हे दोन अडीच किमी चे अंतर कापण्या साठी तब्बल दिड तास लागला या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिका-यांनी तपासनी केली असता सदरील युवकाला उपचारा साठी आणायला दहा मिनिटे उशिर झाल्याचे सांगुन मृत घोषीत केले. या वेळी येथे उपस्थित सर्वांची मने सुन्न झाली. हा प्रकार केवळ रस्त्या अभावी झाल्याची भावना सर्वांना वेदना देऊन गेली. ही घटना पहिलीच नसुन या पुर्वी ही अनेक वेळा गरोदर महीला,वृद्ध,आजारी व्यक्ती यांना उपचारा साठी नेता न आल्याने मृत्यू झाल्याचे ग्रामस्थ सांगतात. या विषयी शासन,प्रशासन,लोकप्रतिनिधी जानिवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याची भावना व्यक्त करतात. प्रगत म्हणवणा-या महाराष्ट्रा साठी केवळ वेळेवर उपचारा साठी पोहता न आल्याने एका तीस वर्षीय तरुनाला प्राण गमवावे लागले ही लाजिरवाणी बाब असल्याची भावना जागृत झाल्या शिवाय राहात नाही.
Previous article
Next article
Leave Comments
टिप्पणी पोस्ट करा