मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न - दैनिक शिवस्वराज्य

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न


सलिम शेख मंगळवेढा तालुका प्रतिनिधी :-

पंढरपूर :- मंगळवार दि.20 रोजी आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी ची शासकीय महापूजा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब व त्यांच्या पत्नी सौ रश्मी ठाकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला.
     या महापूजेच्या वेळी वारकरी केशव कोलते व पत्नी सौ.इंदुबाई कोलते महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूर जिल्हा पालकमंत्री दत्तात्रय भरणे व पत्नी सौ. सारिका भरणे हे उपस्थित होत्या.
    कोरोना च्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरात सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आलेले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पंढरपूर शहर व परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
Previous article
Next article

Leave Comments

टिप्पणी पोस्ट करा

Articles Ads

Articles Ads 2

Advertisement Ads